शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

माझी कृषी योजना : शेतीनिष्ठ पुरस्कार योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 11:58 IST

शेतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. 

शेतीनिष्ठ पुरस्कार योजना १९६७ सालापासून सुरू करण्यात आलेली आहे. शेतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. 

शेतकऱ्यांनी स्वत:च्या कल्पनेने नवनवीन पद्धतीने पीक लागवड करणे तसेच जवळपासच्या शेतकऱ्यांना शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणे,  शेतीपूरक व्यवसाय, हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाडे, निलगिरी, सुबाभूळ आदींची लागवड करणे, शासन, सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्ज रकमेचा शेतीसाठी सुयोग्य वापर तसेच वेळेवर कर्जाची परतफेड आदींमध्ये उल्लेखनीय कार्य असलेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

दरवर्षी आदिवासी गटासह २५ शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रोख अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सदर व्यक्तीचा सपत्नीक सत्कार हे पुरस्काराचे स्वरूप आहे. कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समिती राज्यभरातून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी