शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

एमआयएमची ‘ऑफर’ ‘मविआ’ने फेटाळली; म्हणाले, ही तर भाजपची ‘टीम बी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 08:00 IST

‘औरंगजेबासमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत युती होण्याचा प्रश्नच नाही’ असे सांगत शिवसेनेने लगेच हात झटकले.  एमआयएमला आघाडीत घेण्याची शक्यता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी फेटाळली.

मुंबई : खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव दिल्याने शनिवारी त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले. मात्र, तिन्ही पक्षांनी ही ऑफर स्पष्ट शब्दात फेटाळली. ‘औरंगजेबासमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत युती होण्याचा प्रश्नच नाही’ असे सांगत शिवसेनेने लगेच हात झटकले.  एमआयएमला आघाडीत घेण्याची शक्यता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी फेटाळली. यानिमित्ताने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. समविचारी पक्ष एकत्र येणे ही आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. पण समविचारी कोण हे तपासून बघावे लागेल, असे सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या विधानाला एकप्रकारे ‘खो’ दिला. खासदार इम्तियाज जलील हे एमआयएमचा राजीनामा देऊन आले, तर त्यांना राष्ट्रवादीत घ्यायला काहीच हरकत नाही. नक्कीच पवार साहेब त्यांना पक्षात घेतील, अशी ‘काउंटर ऑफर’ राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. जलिल यांच्याशी मी अनौपचारिक चर्चा केली. महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या एमआयएमच्या प्रस्तावावर आघाडीचे नेते निर्णय घेतील, असे मी त्यांना सांगितल्याची प्रतिक्रिया आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे माझ्या निवासस्थानी आले होते. तेव्हा, उत्तर प्रदेशमध्ये एमआयएममुळे भाजप जिंकल्याचे ते म्हणाले. त्यावर मी म्हणालो की, हे आरोप एकदाचे संपू द्या. काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रस्ताव देत आहोत.  एमआयएमला आघाडीत घेण्याचा माझा निरोप शरद पवार यांना द्या. तुमच्या तीनचाकी रिक्षाला आमचेही एक चाक जोडून द्या. मोटार कार करा आणि बघा ती कशी चालते.  - इम्तियाज जलिल, खासदार, एमआयएम

एमआयएमने आधी ते भाजपची ‘बी टीम’ नाहीत, हे सिद्ध करावे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास कमी झाला आहे. राजेश टोपे सांत्वनासाठी गेले होते. त्यांनी राजकीय चर्चा केली नसेल, अशी माझी खात्री आहे.     - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :All India Majlis-e-Ittehadul Muslimeenआॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसImtiaz Jalilइम्तियाज जलील