शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मुस्लीमबहुल गावात गोहत्या बंदी!

By admin | Updated: July 11, 2014 00:31 IST

शिरपूर खेट्रीवासीयांनी केला निर्धार; मुस्लीम नेत्याचाच पुढाकार

खेट्री: शिरपूर खेट्री.. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामध्ये १५00 लोकसंख्या असलेले एक लहानसे गाव. ९५ टक्के मुस्लीम धर्मियांची घरं असलेल्या या ग्रामवासीयांनी मुस्लीम नेत्याने दिलेल्या गोहत्या बंदीच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि हिंदू धर्मियांच्या गोमातेचे रक्त गावात सांडू न देण्याचा निर्धार केला. पोलिस दलाच्या दप्तरी संवेदनशील म्हणून नोंद असलेल्या अकोला जिल्ह्यातील मुस्लीमबहूल गावाने गोहत्या बंदीसाठी घेतलेला पुढाकार निश्‍चितच प्रेरणादायी आहे.शिरपूर खेट्री हे गाव मुस्लीमबहुल असल्याने, या गावातील नेते सार्वजनिक जीवनात वावरताना गोहत्येच्या मुद्यावरून त्यांना नेहमी हिनवले जायचे. तुमच्या गावात गायींची हत्या मोठय़ा प्रमाणात केली जाते, अशी टीका त्यांच्यावर व्हायची. यातून गावाची बदनामीही व्हायची. त्यामुळे भाजपचे पातूर तालुक्यातील अल्पसंख्याक आघाडीचे माजी अध्यक्ष आसिफ खाँ इनायत खाँ यांनी गावातील नेत्यांना एकत्र केले. गोहत्येमुळे लोकांचा गावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, त्यामुळे गावकरी तसेच गावातील मांस विक्रीचा व्यवसाय करणारे यापुढे गोहत्या करणार नाही, गायीचे मांस खाणार नाही, गायीची विक्री करणार नाही आणि कुणालाही करू दिली जाणार नाही, असा निर्धार त्यांनी ग्रामस्थांकडून करून घेतला. जवळपास वर्ष झाले, गावकरी या निर्धारावर ठाम आहेत. त्यामुळे एकेकाळी गोहत्येसाठी जिलत कुप्रसिद्ध असलेल्या खेट्री गावावरील कलंक दूर होण्यास मदत झाली. ** ह्यपाच मिनिट का मदरसाह्णतून मिळाली प्रेरणामुस्लीम धर्मियांमध्ये शरियत कायद्याला महत्त्व आहे. शरियतनुसार गोहत्या करणे पाप मानले जाते. इस्लामिक कायद्याचे पालन करून घेणारे उलेमा, मुफ्ती यांनी लिहिलेल्या ह्यपाच मिनिट का मदरसाह्ण या पुस्तकात गायीचे मांस खाणे आरोग्यास घातक आणि दुध, तूप खाणे फायदेशीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यातून प्रेरणा घेत आसीफ खाँ आणि गावातील मुस्लीम धर्मियांनी गोहत्या बंदी करण्याचा निर्णय घेतला.** गावात २५0 गायीगावातील कुटुंब्ीायांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे पशुधन हे या कुटुंबीयांसाठी महत्त्वाचे आहे. गावात २५0 पेक्षा जास्त गायी आहेत. येथील सरपंचसुद्धा गोहत्या बंदीच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करतात.