पुणे : तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वडकी येथील शिवसेनेच्या युवासेनेच्या विभागप्रमुखाची बुधवारी भरदुपारी चार गोळ्या झाडून हत्या केली. हत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसले, तरी पूर्ववैमनस्यासातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.हेमंत प्रकाश गायकवाड (३२, रा. तळवडी, वडकी) असे हत्या करण्यात आलेल्याचे नाव आहे. हेमंत यांची सिक्युरिटी एजन्सी आहे. वडकी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फोटो स्टुडिओमध्ये ते गेले होते. फोटो स्टुडिओमधील कामगार जेवणासाठी गेला होता. त्या वेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
पुण्यात युवासेनेच्या विभागप्रमुखाची हत्या
By admin | Updated: September 10, 2015 03:35 IST