शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

कुपवाडमध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून खून; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 21:48 IST

एका अल्पवयीन युवकाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क, कुपवाड : कुपवाड एमआयडीसीमधील बंद अवस्थेत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासमोरील रस्त्यावर उमेश मच्छिंद्र पाटील (वय २१, रा. श्रीनगर, मशिदीजवळ, कुपवाड) याचा डोक्यावर शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कुपवाड पोलिसांच्या मदतीने संशयित साहिल ऊर्फ सुमित मधुकर खिलारी (वय २४, मूळ रा. बुलढाणा, सध्या रा. बामणोली), सोन्या ऊर्फ अथर्व किशोर शिंदे (वय २०, रा. बामणोली) या दोघांना अटक करून अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले. प्रेमाच्या त्रिकोणातून हा खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उमेश पाटील हा कुपवाड एमआयडीसीमधील ऐरावत पॅकेजिंग या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम पाहत होता. संशयित सोन्या ऊर्फ अथर्व शिंदे हा देखील याच कंपनीत काम करत होता. उमेश आणि सोन्या यांच्यात प्रेमप्रकरणावरून धुसफूस सुरू होती. तसेच दोघांचा जोरदार वाद झाला होता. त्यामुळे सोन्याला उमेशवर राग होता. याच रागातून त्याने साथीदार साहिल आणि अल्पवयीन युवकाच्या मदतीने उमेशचा काटा काढायचा ठरवले. उमेश शुक्रवारी सकाळी ९ वाजता कामावर गेला होता. कामावर जाण्यासाठी महिन्यापूर्वी नवीन दुचाकी (एमएच १० ईएन ६६०१) घेतली होती. रात्री नटराज कंपनीजवळ साहिल, सोन्या आणि अल्पवयीन मुलाने उमेशला अडवून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारले. उमेश गंभीर जखमी होऊन खाली पडल्यानंतर हल्लेखोर पळाले.

दरम्यान, रात्री ९.४५ च्या सुमारास उमेश पाटील याच्यावर हल्ला झाल्यानंतर कंपनीतील एका कामगाराने याबाबत उमेशच्या घरी जाऊन आईवडील तसेच भावाला ‘उमेशला काहीतरी झाले आहे. तो नटराज कंपनीजवळ पडला आहे’ असे सांगितले. त्यामुळे उमेशचा भाऊ महेश कामगाराच्या दुचाकीवर बसून घटनास्थळी गेला. या वेळी उमेश पाटील हा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडलेला होता. त्याच्या डोक्यावर वार झाल्याचे दिसत होते.

तेवढ्यात उमेशच्या कंपनीचे मालक विनायक घुळी व इतर कामगार उपस्थित होते. महेश पाटील व कामगार जकाप्पा लवटे या दोघांनी आयुष हेल्पलाइन टीमच्या मदतीने रुग्णवाहिकेतून जखमी उमेशला मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमी उमेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भाऊ महेश पाटील यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

खुनाची माहिती मिळताच मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, कुपवाडचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी कुपवाड पोलिसांच्या दोन पथके हल्लेखोरांच्या शोधासाठी रवाना केली होती.सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील सतीश माने, सागर लवटे यांना संशयित साहिल खिलारी वन विभागाच्या रस्त्यावर थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार सोन्या शिंदे व अल्पवयीन युवक अशा तिघांनी खून केल्याची कबुली दिली. तिघांना कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले.

प्रेमप्रकरणातून वाद

मृत उमेश आणि संशयित सोन्या यांच्यात प्रेमप्रकरणावरून वाद झाला होता. प्रेमाचा त्रिकाेण झाला होता. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. उमेश हा सुपरवायझर असल्यामुळे तो सतत कामाला जुंपून स्वत: महिलेशी जास्त बोलत असल्याचा सोन्याला राग होता. त्यातून साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे कबूल केले.

काही तासांत छडा

खुनानंतर गुन्हे अन्वेषण व कुपवाड पोलिसांची पथके संशयितांच्या मागावर होती. कसून तपास केल्यानंतर खुनाचे नेमके कारण समजले. त्यानंतर काही तासांतच दोघांना अटक करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत छडा लावला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी