मुंबई : वरळीतून बेपत्ता झालेल्या दोन वर्षांच्या यश्वीन देवेंद्र या मुलाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपींची धरपकड सुरू केली आहे. रविवारी संध्याकाळी मित्रांसोबत घराबाहेर खेळत असताना गायब झाला. त्याचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी वरळी पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध सुरू केला. (प्रतिनिधी)
वरळीत चिमुरड्याची हत्या
By admin | Updated: March 1, 2017 06:22 IST