शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

नगरपालिकांचा फड वर्षअखेरीस रंगणार

By admin | Updated: October 18, 2016 05:59 IST

महाराष्ट्राच्या नागरी भागाचा हिस्सा असलेल्या १४७ नगरपालिका आणि १८ नगर पंचायतींसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होणार

मुंबई, ठाणे वगळता आचारसंहिता लागूमुंबई : महाराष्ट्राच्या नागरी भागाचा हिस्सा असलेल्या १४७ नगरपालिका आणि १८ नगर पंचायतींसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होणार असून या निवडणुकीसाठी मुंबई, ठाणे वगळता इतरत्र आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.राज्यातील १९२ नगरपालिका आणि २० नगरपंचायतींसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात १६५ शहरातील पालिकांचा समावेश असून नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार असल्याने या लहान शहारांचा कौल कोणाकडे, याबाबत उत्सुकता आहे.निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. नगरपालिकांच्या अध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून होईल. तसेच तेथे प्रभाग पद्धत असेल. त्यामुळे एक मतदार तीन ते चार (अध्यक्षांसह) मते देईल. नगर पंचायतींमध्ये मात्र वॉर्ड पद्धतीने निवडणूक होणार असून तेथे नगरसेवकांमधून अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. एकूण ४,७५० जागांचा फैसला होणार आहे. पनवेल व नागभीड यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने निवडणूक होणार नाही. (विशेष प्रतिनिधी)>पुढील ८२ दिवस असतील आचारसंहितेचेपालिका निवडणुकीसाठीची आचारसंहिता आजपासून लागू झाली. त्यामुळे राज्य सरकारला मतदारांना प्रलोभन ठरेल असे कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत. पुढील ८२ दिवस आचारसंहितेचे असतील. चार किंवा त्यापेक्षा अधिक नगरपालिकांची निवडणूक असलेल्या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण जिल्हाभर आचारसंहिता असेल. तीन किंवा त्यापेक्षा कमी नगरपालिकांमध्ये निवडणूक असलेल्या जिल्ह्यात केवळ त्या नगरपालिका क्षेत्रापुरतीच आचारसंहिता असेल. सर्व ठिकाणची आचारसंहिता निकालानंतर संपुष्टात येईल. >अशी होणार निवडणूकनिवडणूक होत नगरपालिका/ उमेदवारी अर्ज मतदानाची मतमोजणीअसलेले जिल्हे नगरपंचायती भरण्याचा कालावधीतारीखतारीख२५ जिल्हे १४७ नगरपालिका २४ ते २९ आॅक्टोबर २७ नोव्हेंबर २८ नोव्हेंबर१८ नगरपंचायती२ जिल्हे १४ नगरपालिका ११ ते १९ नोव्हेंबर १४ डिसेंबर १५ डिसेंबर४ जिल्हे २० नगरपालिका२ नगरपंचायती १९ ते २५ नोव्हेंबर १८ डिसेंबर १९ डिसेंबर२ जिल्हे ११ नगरापलिका ९ ते १७ डिसेंबर ८ जाने. १७ ९ जानेवारीराखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोचपावती उमेदवारी अर्जासोबत सादर करण्याची मूभा असेल. अशा उमेदवारांना निवडून निकालाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल.