मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाची किंमत सातत्याने घसरत असल्याचा फटका जकात उत्पन्नाला बसला आहे़ त्यामुळे सेवा व वस्तू कर पुढच्या वर्षीपासून लागू होण्यापूर्वी आर्थिक बाजू मजबूत करण्याचे मनसुबे आखणाऱ्या पालिकेचे गणित कोलमडले आहे़ परिणामी, विकासकामांसाठी हात आखडता घेण्याची वेळ येणार आहे़सन २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात जकात करातून ७८०० कोटींचा महसूल जमा करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले होते़ परंतु कच्च्या तेलाचे दर सतत गडगडत असल्याने पालिकेने हे लक्ष्य कमी करून ७३०० कोटींवर आणले़ परंतु बाजारपेठेत हीच परिस्थिती कायम राहिल्यामुळे जकात उत्पन्नामध्ये गतवर्षीच्या तुलनेत १२२ कोटी रुपयांची घट झाली आहे़ गतवर्षी ६७७२ कोटी रुपये जकात उत्पन्न जमा झाले होते़ (प्रतिनिधी)
पालिकेचे गणित बिघडले!
By admin | Updated: April 4, 2015 05:07 IST