शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या दारी महामार्गांचा हत्ती

By admin | Updated: April 5, 2017 00:41 IST

दारूसाठी खटपट सारी : दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा बोजा पडणार; आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास

इंदुमती गणेश--कोल्हापूर --‘शास्त्रीय संगीत ही दैवी शक्ती आहे. त्यातील ‘सा’ कळायलाही आयुष्य जाते. सुरांना आपल्याशी काहीतरी बोलायचं आहे. आयुष्यभर मी दैवी अस्तित्वाची ही कला जोपासली,’ या शब्दांत संगीतपरंपरेचा अभिमान व्यक्त करणाऱ्या गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्यासाठी कोल्हापूर म्हणजे त्यांच्या गायकीचे माहेर. त्यांच्या आई मोगूबाई कुर्डीकर या कोल्हापूरचे राजदरबारी गायक उस्ताद अल्लादिया खाँ यांच्या शिष्या. मूळच्या कोल्हापूरच्या जयपूर अत्रौली घराण्याच्या रागदारी गायकीचे सूर पहिल्यांदा त्यांनी कोल्हापूरच्या रंगमंचावर आळविले. राजर्षी शाहू महाराज यांनी उस्ताद अल्लादिया खाँ यांची दरबारी गायक म्हणून नियुक्ती केली होती. किशोरीतार्इंचा आई मोगूबाई कुर्डीकर या उस्ताद अल्लादिया खाँ व हैदर खाँ यांच्या थेट शिष्या. उस्ताद अल्लादिया खॉँ यांची जयपूर घराण्याची मूळ गायकी असल्याने किशोरीताई या शहराला आपले ‘गानमाहेर’ मानायच्या. मोगुबार्इंच्या शिस्तीत शास्त्रीय संगीताचे धडे घेतलेल्या किशोरीताई आईच्या मागे बसून गाणं शिकल्या. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडे त्यांनी बंदिशीचे धडे घेतले. खर्डेकर बोळात बापूसाहेब करमरकर यांच्याकडे त्या बऱ्याचदा मुक्कामाला असायच्या. गायन समाज देवल क्लबमध्ये त्यांनी बालपणापासून अनेक मैफली गाजविल्या. ‘नाव व पैसा मिळणारे संगीत गाऊ नकोस,’ ही आईने दिलेली शिकवण पाळत त्यांनी शास्त्रीय संगीताचा वैश्विक विचार केला. माझं माहेर असलेल्या कोल्हापूरच्या उस्ताद अल्लादिया खाँ यांच्या संगीतपरंपरेचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत त्या कोल्हापूरबद्दलचे प्रेम व्यक्त करत. कोल्हापूरची गानपरंपरा आणि गायन समाज देवल क्लबशी किशोरीतार्इंचा वर्षानुवर्षांचा ऋणानुबंध. गतवर्षी म्हणजेच डिसेंबर २०१६ मध्ये देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी त्या कोल्हापुरात आल्या होत्या. हा त्यांचा अखेरचा दौरा ठरला. छत्रपती शाहू साखर कारखाना, देवल क्लब आणि व्हायोलीन अकादमी, पुणे यांच्या वतीने २०१२ साली आयोजित उस्ताद अल्लादिया खाँ संगीत महोत्सवात किशोरीतार्इंना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आम्ही आयुष्यभर सुरांची आराधना केली. सुरांच्या इच्छेनुसार आम्ही गायलो. शास्त्रीय संगीत म्हणजे नोटेशन नव्हे. सूर आपल्या हृदयात यावे लागतात. मग हृदय सुरांकडे येते, तेव्हा शास्त्रीय संगीत तयार होते. आज मात्र संगीताची उपासनाच होत नाही. प्रेक्षकांची अभिरुची ओळखून सुरांना गुलाम केले जाते. त्यामुळे सूर आणि साधकांमध्ये एकमेकांना समजून घेण्याचा धागाच राहिलेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.कोल्हापुरातील यांच्याशी स्नेह कोल्हापुरात आल्या की किशोरीताई आधी त्यांची कुलस्वामिनी श्री अंबाबाईचे दर्शन घ्यायच्या. कितीही व्यस्त कार्यक्रम असला तरी नृसिंहवाडीला जाऊन श्रीदत्तांचे दर्शन हा ठरलेला कार्यक्रम असायचा. पिठलं-भाकरी हा त्यांचा आवडता मेनू. किशोरीतार्इंचा ज्येष्ठ दिवंगत ध्वनिमुद्रक गोपाळ खेर, बाळ घाटगे, श्रीपाल सदावर्ते, व्ही. बी. पाटील यांच्याशी विशेष स्नेह होता. आपल्या शिष्यांना त्या आवर्जून भेटायच्या आणि शास्त्रीय संगीताचे ज्ञान द्यायच्या. पी हळद अन् हो गोरी...!संगीताच्या रिअ‍ॅलिटी शोबद्दल त्यांना प्रचंड तिटकारा होता. आम्ही संगीतात कधी महासंग्राम, महागायक, महायुद्ध असे शब्द ऐकले नव्हते. आम्ही ऐकले आणि जगलो ते फक्त सूर आणि त्यांचे विश्व. टी.व्ही.वरील हे कार्यक्रम आणि परीक्षक मुलांना साधनेशिवाय मोठं करतात. शास्त्रीय संगीतातील एकदशांश भागसुद्धा मिळवायची त्यांची तयारी नसते. ‘पी हळद आणि हो गोरी’ असं शास्त्रीय संगीतात होणार नाही, असे त्या कळकळीने म्हणाल्या. कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबच्या रंगमंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी २ जानेवारी २०१६ रोजी उपस्थित असलेल्या किशोरीताई आमोणकर यांना अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अभिनेते नाना पाटेकर उपस्थित होते. किशोरीतार्इंचा हा अखेरचा कोल्हापूर दौरा ठरला. दुसऱ्या छायाचित्रात कोल्हापुरातील देवल क्लबमध्ये एका मैफलीत गायन केल्यानंतर किशोरीतार्इंनी श्रोत्यांना अभिवादन केले. (देवल क्लबच्या संग्रहातील छायाचित्र)