मुंबई : दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने ठेकेदाराबरोबर नगरसेवकांचे संगनमत असल्याचा आरोप केला होता़ हेच आरोप आज पुन्हा पालिकेच्या महासभेत घुमले़ मात्र या वेळी प्रशासन आरोपीच्या पिंज-यात होते़ ई निविदेला विरोध असतानाही आयुक्तांनी ही पद्धत माथी मारल्यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे़ या घोटाळ्याच्या चौकशीसाठी महासभा आज पुन्हा तहकूब करण्यात आली़वॉर्डातील सिव्हिल वर्क कॉन्ट्रॅक्टर आणि नगरसेवकांमध्ये लागेबांधे असल्यामुळेच नागरी कामे सुमार दर्जाची होत असल्याचा आरोप मुख्य लेखापालांनी गोपनीय पत्रातून केला होता़ त्यामुळे ई निविदेचा भ्रष्टाचार उघड होताच नगरसेवकांनी आयुक्तांना कोंडीत पकडले़ शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे, काँग्रेसच्या शीतल म्हात्रे, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, सुनील प्रभू, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी प्रशासनावर हल्ला चढविला़ (प्रतिनिधी)
पालिका प्रशासन आरोपीच्या पिंज-यात
By admin | Updated: September 24, 2014 05:36 IST