शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मुंबईचे किमान तापमान १८ अंशांवर स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 06:21 IST

गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.

मुंबई : रविवारी मुंबईचे किमान तापमान १८ अंश नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १३.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मुंबई वगळता राज्यात कमालीचा गारठा जाणवत असून, मुंबईत आता कुठे किंचित थंडी अनुभवास येत आहे.

गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या संपूर्ण भागात व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे.

विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. १६ ते १९ डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. सोमवारसह मंगळवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात चांगलीच घट नोंदविण्यात येत आहे. शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १९ अंश नोंदविण्यात आले असतानाच शनिवारी यात आणखी घट झाली आहे. शनिवारी मुंबईचे किमान तापमान १८ अंश नोंदविण्यात आले असून, रविवारीही मुंबईचे किमान तापमान १८ अंश नोंदविण्यात आले.शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्येपुणे १५.२जळगाव १५.६महाबळेश्वर १४.४मालेगाव १५.५नाशिक १४सातारा १५.८उस्मानाबाद १३.८औरंगाबाद १६.३नांदेड १६नागपूर १६.८वाशिम १५.८यवतमाळ १६.४

टॅग्स :Temperatureतापमानweatherहवामान