शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘मुंबईचा दादा शिवसेनाच, आम्हाला तुरुंगात टाकलं तर तुम्हालाही तुरुंगात जावं लागेल’ संजय राऊतांचा रोखठोक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 10:38 IST

Sanjay Raut News: शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील नेत्यांच्या होत असलेल्या चौकशांवरून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

मुंबई - शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील नेत्यांच्या होत असलेल्या चौकशांवरून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. केंद्रातील मोदी सरकार हे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ह्या गुंडांच्या टोळ्या झाल्या आहेत. सरकार पाडण्यासाठी माझ्यासह शरद पवारांनाही धमक्या दिल्या गेल्या आहेत. मात्र या सर्वांची मी पोलखोल करणार आहे. आम्हाला तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र आम्हाला तुरुंगात टाकलं तर तुम्हालाही तुरुंगात जावं लागेल, असा रोखठोक इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी आज राज्यसभेचे सभापती असलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि शरद पवार यांना एक पत्र लिहून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमधून संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपावर गंभीर आरोप केले. केंद्रातलं सरकार आपल्या विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर करतंय. त्याची माहिती राज्यसभेच्या सभापतींना माहिती द्यावी म्हणून मी हे पत्र लिहिलं आहे. ईडी आणि इतर राष्ट्रीय तपाय यंत्रणा ह्या भाजपाच्या आणि त्यांच्या इतर मालकांच्या क्रिमिनल सिंडिटेच्या भाग बनल्या आहेत. आजचं पत्र हे केवळ माहितीसाठी आहे. तो ट्रेलर नाही. ट्रेलर अजून यायच्या आहेत. या यंत्रणा ब्लॅकमेल करतात. यांचे एजंट आहेत. याचे पुरावे मी देणार आहे.

या यंत्रणा ठाकरे परिवाराला बदनाम करत आहेत. माझ्यासारख्या नेत्यांना बदनाम करत आहेत. शरद पवार यांच्या कुटुंबीयांना बदनाम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये तपास यंत्रणा आहेत. त्या आधी तपास करतील. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांच्यावर तुम्ही आलाय का. तुम्ही फेडरल सिस्टिमची वाट लावताय. त्यामुळे यांची संपूर्ण पोलखोल करावी लागेल. याबाबत माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. ही सुरुवात आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

भाजपाचे नेते आम्हाला अनिल देशमुख यांच्या शेजारच्या कोठडीत जावं लागेल, अशा धमक्या देताहेत. पण लक्षात ठेवा. आम्हाला तुरुंगात पाठवलं तर आमच्या पाठोपाठ तुम्हालाही तुरुंगात यावं लागेल. कारण तुमची पापं जास्त आहेत. आम्ही शुद्ध आहोत. आम्ही तुम्हाला घाबरत नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

ईडीला ज्या कायदेशीर कारवाया करायच्या आहेत त्या त्यांनी करत राहावे. पण एक सांगतो तुमचा चेहरा समोर आणल्याशिवाय मी राहणार नाही. ईडीच्या कार्यालयात काय चालतं हे मी समोर आणल्याशिवाय नाही. हे लोक मुंबईत दादागिरी करतात. बाहेरच्या एजन्सी महाराष्ट्राच्या नागरिकांना, मुंबईच्या नागरिकांना बेकायदेशीररीत्या डांबून ठेवतात. मुंबई पोलिसांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. बाहेरचे हे लोक सुपाऱ्या घेऊन येतात. १२-१२ तास डांबून ठेवतात. धमक्या देता. काही लोकं ज्यांना धमक्या दिल्या आहेत ते याविरोधात तक्रार करणात आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

यावेळी राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांनाही इशारा दिला. ते म्हणाले की, ही मुंबई आहे. मुंबईचा दादा शिवसेना आहे. आता तुम्ही शिवसेनेची पाहाच. देवेंद्र फडणवीसांना आवाहन करतोय. त्यांना माहिती आहे मला काय सांगायचे आहे ते. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरात जाता येणार आहे. आता पुढची पत्रकार परिषद शिवसेना भवनात आणि त्यानंतरची पत्रकार परिषद ही ईडीच्या कार्यालयासमोर घेणार आहे. त्या मोठा गौप्यस्फोट करणार, असे संकेतही संजय राऊत यांनी दिले आहेत. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण