शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
4
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
5
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
6
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
7
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
8
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
9
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
10
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
11
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
12
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
13
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
14
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
15
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
16
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
17
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
18
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
19
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
20
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!

काँग्रेसच्या काळातच मुंबईचा विकास

By admin | Updated: February 13, 2017 03:53 IST

जागतिक दर्जाचे विमानतळ असो की मेट्रो, मोनोरेल, वांद्रे-वरळी सागरी मार्ग, इस्टर्न फ्री वे अशी सारी विकासकामे केवळ काँग्रेस सरकारच्या काळात झाली

मुंबई : जागतिक दर्जाचे विमानतळ असो की मेट्रो, मोनोरेल, वांद्रे-वरळी सागरी मार्ग, इस्टर्न फ्री वे अशी सारी विकासकामे केवळ काँग्रेस सरकारच्या काळात झाली. मात्र, वीस वर्षे पालिकेत सत्ता गाजविणाऱ्या शिवसेना-भाजपाला मुंबईसाठी साध्या मूलभूत सोईसुविधा पुरवता आल्या नाहीत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिंदबरम यांनी केली. रविवारी मुंबई काँग्रेसतर्फे अंधेरी येथील रहेजा आयोजित कार्यक्रमात चिदंबरम बोलत होते. या वेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी आदी नेते उपस्थित होते. ते म्हणाले की, मुंबई हे देशाला सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या शहरांपैकी एक शहर आहे आणि इथे चांगले रस्ते नाहीत, रेल्वेची चांगली सुविधा नाहीत. महापालिकेकडून, सरकारकडून सामान्य जनतेला ज्या मूलभूत सुविधा मिळायला हव्यात, त्याही मुंबईत मिळत नाहीत. गेल्या वीस वर्षांमध्ये महापालिकेच्या सत्तेवर असणारे सामान्य जनतेला चांगले रस्ते, चांगली दळणवळणाची साधने का देऊ शकले नाहीत, असा आरोप चिदंबरम यांनी केला. जो देश अंतराळात यान पाठवतो. इतके प्रगत तंत्रज्ञान ज्या देशात आहे, अशा देशातील मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात उच्च दर्जाची रेल्वे व्यवस्था लोकांना मिळत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. सध्या मुंबईचा स्तर इतर शहरांच्या तुलनेत घसरत चालला आहे. त्यामुळे अशा लोकांना महापालिकेची सत्ता देण्यापेक्षा मुंबईच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरत चालला आहे. देशाचा विकासदर २०१६-१७ मध्ये ७.९ टक्क््यांवरून ६.६ टक्क्यांवर घसरला आहे. आगामी काळात आणखी त्यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. हा नोटाबंदीचा परिणाम आहे. या निर्णयामुळे छोटे व्यावसायिक व सामान्य जनतेला फार हाल सहन करावे लागले. लोकांचा बँकांवरून विश्वास उडाला आहे. सध्या जो अर्थसंकल्प सादर केला गेला, त्यातही मध्यमवर्गीय, तसेच छोट्या व्यावसायिकांसाठी काहीही दिलासा देण्यात आली नसल्याची टीका चिदंबरम यांनी केली. (प्रतिनिधी)