शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

मुंबईकरांचे ‘मेघा’हाल, रेल्वेसह रस्ते वाहतूक विस्कळीत, मुंबई 'ऑफ द ट्रॅक'वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 07:04 IST

मुंबई : रेल्वे म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी. तिच्यामुळेच मुंबईकरांचे जीवन वेगाने धावत असते. परंतु मंगळवारी मुसळणार पावसामुळे रेल्वेसेवा कोलमडली. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे मुंबईकरांचे ‘मेघा’हाल झाले. आणि सतत ‘आॅन द ट्रॅक’ असणारी मुंबई ‘आॅफ द ट्रॅक’ झाली.मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने सायंकाळपर्यंत चांगलाच ...

मुंबई : रेल्वे म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी. तिच्यामुळेच मुंबईकरांचे जीवन वेगाने धावत असते. परंतु मंगळवारी मुसळणार पावसामुळे रेल्वेसेवा कोलमडली. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे मुंबईकरांचे ‘मेघा’हाल झाले. आणि सतत ‘आॅन द ट्रॅक’ असणारी मुंबई ‘आॅफ द ट्रॅक’ झाली.मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने सायंकाळपर्यंत चांगलाच जोर धरला. दुपारपासूनच मध्य रेल्वेची जलद वाहतूक वगळता धिम्या मार्गावरील वाहतूक १५ मिनिटे विलंबाने सुरू होती. दरम्यान, पावसाचा जोर उत्तरोत्तर वाढू लागला आणि विलंबाने धावू लागलेल्या लोकलमुळे मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली.पावसामुळे रेल्वे वाहतुकीप्रमाणेच रस्ते वाहतुकीलाही ब्रेक लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमातासह सखल भागात पावसाचे पाणी साचले. परिणामी, या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील शीतल आणि कमानी सिग्नल येथील सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. त्यामुळे मुंबईकरांना घर गाठणे कठीण झाले.सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडसह कुर्ला-अंधेरी मार्गावरही ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. मरोळसह अंधेरी येथे वाहतूक कोंडी झाली होती. दादरसह माहीम आणि लोअर परळ येथेही वाहतूक कोंडी झाली होती. महालक्ष्मी येथेही वाहतूक कोंडी झाली होती. पावसाचा जोर जास्त असल्याने वाहनांचा वेग कमी झाला होता. वाढत्या वाहतूक कोंडीने मुंबईकरांच्या मनस्तापात भर पडली.>रांगा वाहनांच्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता येथे पाणी साचले. यासह मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरातील अनेक सखल ठिकाणे पाण्याखाली गेली होती. परिणामी, या मार्गावर वाहनांच्या लांबच लांबरांगा लागल्या होत्या. ठिकठिकाणची वाहतूक कोंडी आणि साचलेले पाणी यातून मार्ग काढताना मुंबईकरांची चांगलीच दमछाक झाली.शिवसेना भवनाजवळील हॉटेल मनोहर येथील झाड कोसळल्याने शिवाजी पार्ककडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.मुसळधार पावसामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला. विमानांची उड्डाणे सरासरी२० मिनिटे उशिराने होती. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाल्यामुळे अनेक प्रवाशांनी मेट्रोकडे धाव घेतली. त्यामुळे मेट्रो रेल्वेच्या स्थानकांवरही प्रवाशांची तुफान गर्दी झाल्याचे चित्र होते.