मुंबई : दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

By Admin | Updated: January 18, 2017 08:05 IST2017-01-18T07:47:19+5:302017-01-18T08:05:28+5:30

दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबईतील चांदिवली परिसरात घडली

Mumbai: Two siblings die drowning | मुंबई : दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

मुंबई : दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबईतील चांदिवली परिसरात घडली आहे. सद्दाम आणि अस्लम अब्दुल शेख अशी मृतांची नावे असून त्यांचा तिसरा भाऊ  भाऊ जावेद शेख याला वाचवण्यात मात्र सुदैवाने यश मिळाले आहे. ही दुर्दैवी घटना काल रात्री चांदिवलीतील मनु भाई खाणीमध्ये घडली. 
काही अडचणींमुळे सद्दामला मानसिक त्रास होता, त्यामुळे त्याने जीवन संपवण्याच्या उद्देशाने खाणीतील पाण्यात उडी मारली. मात्र आपल्या भावाला वाचवण्यासाठी अस्लम आणि जावेदही पाण्यात उतरले. मात्र दुर्दैवाने या घटनेत सद्दाम आणि अस्लमचा मृत्यू झाला तर जावेदला कसेबसे वाचवण्यात यश मिळाले. घटनेचीम माहिती मिळताच अग्निसमन दलाने घटनास्थळी धाव घेतली, रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.  पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Mumbai: Two siblings die drowning