मुंबई : मालवणीमध्ये तिहेरी हत्याकांड, आजीसह नातवंडांची निर्घृण हत्या

By Admin | Updated: June 23, 2016 16:29 IST2016-06-23T11:47:38+5:302016-06-23T16:29:12+5:30

मालवणी परिसरात आजीसह दोन नातवांच्या तिहेरी ह्त्याकांडाने खळबळ उड़ाली आहे.

Mumbai: The Tihar killings in Malvani, the brutal killing of grandchildren with grandmother | मुंबई : मालवणीमध्ये तिहेरी हत्याकांड, आजीसह नातवंडांची निर्घृण हत्या

मुंबई : मालवणीमध्ये तिहेरी हत्याकांड, आजीसह नातवंडांची निर्घृण हत्या

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - मुंबईतील मालाड येथील मालवणीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे हत्याकांड घडले असून आजीसह दोन नातवंडाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. मालवणीतील न्यू कलेक्टर कॉलनीतील गेट. क्रमांक.६, प्लॉट नंबर २३ येथील रूम नंबरमध्ये ९२ येथे हे हत्यांकाड घडले असून त्यामागचे कारण अजून समजू शकलेले नाही. बाबली शॉ (४७), आर्यन इस्माइल शेख (१३) आणि सायना इस्माल शेख (८) अशी मृतांची नावे आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
हे सर्वजण मूळचे बंगळुरूचे असून  बाबली यांच्या मुलीने मुस्लिम तरूणाशी प्रेमविवाह केला होता. मात्र त्या तरुणाने दुसरा विवाह केल्याने बाबली यांची मुलगी, आर्यन व सायना या तिच्या दोन मुलांसह पाच वर्षापुर्वी  माहेरी परत आली. वडील असून त्यांच्याविना वाढणा-या या मुलांचे दुर्दैव तिथेच संपले नाही, तीन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचेही आजाराने निधन झाले व तेव्हापासून त्यांची आजीच त्यांचा सांभाळ करत होती. मात्र काल रात्री अज्ञात व्यक्तीने या दोन्ही मुलांसह त्यांच्या आजीचाही खून केला. 

Web Title: Mumbai: The Tihar killings in Malvani, the brutal killing of grandchildren with grandmother