शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

मुंबईला पावसाने झोडपले

By admin | Updated: June 25, 2016 03:32 IST

मान्सून दाखल झाल्यानंतर मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी शुक्रवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले

मुंबई : मान्सून दाखल झाल्यानंतर मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी शुक्रवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने काही काळ घेतलेली विश्रांती वगळता सायंकाळपर्यंत पडलेल्या मुसळधार सरींमुळे हिंदमाता, परळ टीटी, कुर्ला पश्चिमेकडील कमानी आणि शीतल सिग्नलसह उर्वरित सखल ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. परिणामी रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला असतानाच जोरदार पावसामुळे हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल १० मिनिटे विलंबाने धावत होत्या. पूर्व आणि पश्चिम उपनगरांच्या तुलनेत मुंबई शहरात विशेषत: दक्षिण मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली. मरिन ड्राइव्ह, कुलाबा, फोर्ट, मस्जीद बंदर, भायखळा, वरळी, लालबाग आणि दादर येथे दुपारी पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. तर पूर्व उपनगरांतही दुपारी कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, भांडुपसह मुलुंड येथे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पश्चिम उपनगरांत अंधेरी, बोरीवलीसह जोगेश्वरी येथेही बरसलेल्या पावसाने मुंबईकरांची धावपळ उडाली. मुंबई शहरात पडलेल्या मुसळधार सरींमुळे हिंदमाता, परळ टीटी येथील सखल भागात पाणी साचले. येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेकडून मॅनहोलची झाकणे उघडण्यात आली होती. शिवाय आवश्यक मनुष्यबळही तैनात करण्यात आले होते. तर कुर्ला पश्चिमेकडील शीतल आणि कमानी सिग्नल या सखल ठिकाणीही पावसाचे पाणी साचले होते. साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर मोहम्मद अली रोड, भायखळा, दादर आणि सायन व लाल बहादूर शास्त्री मार्गावर सायन सर्कल, कुर्ला डेपो, कमानी सिग्नल आणि श्रेयस सिनेमा येथील वाहतुकीचा वेग मंदावला होता.तलावांमध्ये पाऊस नाहीच; पाणीकपात कायमगुरुवार रात्रीपासून मुंबईत पावसाने चांगला जोर धरला आहे़ मात्र प्रमुख तलावांच्या क्षेत्राकडे आजही पावसाने पाठ फिरवली आहे़ त्यामुळे तलावांची पातळी खालावत असून राखीव साठ्यावरच पालिकेची मदार आहे़ परिणामी पावसाळ्यातही मुंबईकरांना पाणीकपातीची झळ सहन करावी लागणार आहे़विलंबाने मुंबईत दाखल झालेल्या पावसाने तलाव क्षेत्रांमध्ये मात्र हजेरी लावलेली नाही़ मुंबईत असलेले विहार व तुळशी तलावांमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे़ त्याचवेळी पावसाअभावी भातसा, मोडक सागर, तानसा आणि मध्य वैतरणा कोरडेच आहेत़ तर अपर वैतरणा तलाव पाण्याच्या किमान पातळीपेक्षाही खालावला आहे़ त्यामुळे पाणीसंकट आणखी वाढत चालले आहे़ भातसा, मोडक सागर आणि तानसा या तलावांची याहून वेगळी स्थिती नाही़ त्यामुळे आॅगस्ट महिन्यापासून सुरू असलेली २० टक्के पाणीकपात आणखी काही काळ कायम राहील, असे उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले़ तूर्तास राखीव साठ्यामुळे जुलै महिना सरेल, असा पालिकेचा दावा आहे़ (प्रतिनिधी)झाडे पडण्याच्या तक्रारी शहरात ४, पूर्व उपनगरांत ५ आणि पश्चिम उपनगरांत १० अशा एकूण १९ ठिकाणी झाडे पडली.शॉर्टसर्किट : शहरात ५, पूर्व उपनगरांत १ अशा एकूण ६ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.वाहतूक खोळंबली हिंदमाता येथे पाणी साचल्याने काही कालावधीकरिता येथील वाहतूक फ्लायओव्हरवरून वळवण्यात आली होती. ही वाहतूक सायंकाळी ४.३० वाजता पूर्ववत करण्यात आली.भिंती पडल्यापूर्व उपनगरांत २, पश्चिम उपनगरांत १ अशा एकूण ३ ठिकाणी भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.हवामान अंदाज कुलाबा वेधशाळेने येत्या २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत अधूनमधून मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविला आहे.पाणीसंकट कायम भातसा, मोडक सागर, तानसा आणि मध्य वैतरणा कोरडेच आहेत़, तर अपर वैतरणा तलाव पाण्याच्या किमान पातळीपेक्षाही खालावला आहे़ त्यामुळे पाणीसंकट आणखी वाढत चालले आहे़ दोन्ही परिचारिकांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यापैकी एका परिचारिकेच्या हाताला लागले आहे. दोघींवरही तत्काळ रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. प्रकृती गंभीर नसल्यामुळे वॉर्डमध्येच त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. परिचारिकांच्या कार्यालयातील प्लॅस्टर पडलेला असून, स्लॅब कोसळलेला नाही. - डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय