शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर अप व मिडल लाईन सुरु, मात्र पुण्याकडे जाणारी डाऊन लाईन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 08:44 IST

मालगाडीचे सहा डबे घसरल्याने विस्कळीत झालेली मुंबई पुणे लोहमार्गावरील रेल्वे वाहतूक अजूनही विस्कळीतच आहे.

मुंबई /कर्जत : खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी दुपारी मालगाडीचे सहा डबे घसरल्याने विस्कळीत झालेली मुंबई पुणे लोहमार्गावरील रेल्वे वाहतूक अजूनही विस्कळीतच आहे. मालगाडीचे घसरलेले सहा डबे हटवण्याचं काम अद्यापही सुरु असून रात्रभर युध्दपातळीवर केलेल्या कामानंतर मुंबई व पुणे दोन्ही बाजुकडे जाणारी मिडल लाईन व मुंबईकडे जाणारी अप लाईन सुरु करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. 

नुकतीच सकाळी साडेसात वाजता सिंहगड एक्सप्रेस व नांदेड एक्सप्रेस येथून मुंबईकडे रवाना झाली. मात्र मोठ्या प्रमाणात रेल्वेचे रुळ व स्लिपर खराब झाल्याने तसेच विजेचे खांब पडल्याने मुंबईहून पुण्याकडे येणारी डाऊन लाईन अद्याप पुर्णतः बंद आहे. डाऊन लाईन सुरु करण्यासाठी संध्याकाळपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. 

डाऊन लाईन सुरु झाल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर येईल. रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व यंत्रसामुग्री घटनास्थळी असून काम लवकरात लवकर पुर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या अप व मिडेल लाईन सुरु झाल्याने वाहतुक सुरु झाली असली तरी दोन्ही बाजूने रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत.

खंडाळा येथील मंकी हिल परिसरात कर्जतहून पुण्याला जाणा-या मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणा-या एकूण १८ एक्स्प्रेसवर याचा परिणाम झाला आहे. या अपघातामुळे १० एक्स्प्रेस पूर्णत: तर ५ एक्स्प्रेस अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. ३ एक्स्प्रेस पर्यायी मार्गावरून चालवण्यात येत आहेत.

खंडाळा येथे दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी मालगाडीचे हे डबे घसरले. या घटनेची माहिती मिळताच अपघात मदत ट्रेन तातडीने घटनास्थळी रवाना झाली. रेल्वे सेवा पूर्वपदावर करण्यासाठी लोणावळा, कर्जत येथील रेल्वेच्या बांधकाम विभागातील तसेच वीज वाहक कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. रेल्वे रूळ बदलण्याचे काम व क्रेनच्या साहाय्याने घसरलेले डबे उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या अपघातामुळे विशेषत: सीएसएमटी येथून पुणे, सोलापूर, कोल्हापूरकडे जाणाºया एक्स्प्रेसवर परिणाम झाला आहे. 

प्रवाशांसाठी बसची व्यवस्था-प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चार बसगाड्या कर्जत ते पुणे मार्गावर चालविण्यात आल्या आहेत. आणखी ३ बसगाड्या कर्जत येथे पुण्यासाठी मार्गस्थ करण्यात येणार आहेत. दादर येथून पुण्यासाठी जाणाºया प्रवाशांसाठी १० खासगी बसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.डहाणू यार्डातही मालगाडी घसरली-डहाणू यार्डात रिकाम्या डब्यांची ने-आण करणारी मालगाडी सायंकाळी ६.४0 वाजता यार्डाच्या दिशेने जात असताना दोन डबे रुळावरून घसरले. यात कोणीही जखमी झालेले नाही.यार्डातील रुळावरून डबे घसरल्यामुळे लोकल सेवेवर त्याचा परिणाम होणार नाही. पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक सुरळीत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गजानन महतपूरकर यांनी दिली.यूपीत दोन गाड्या घसरल्या-सोनभद्र : हावडा ते सिंगरौलीला जाणाºया शक्तीपूंज एक्स्प्रेसचे सात डबे उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात ओबरा डॅम स्टेशनजवळ गुरुवारी सकाळी ६.२५ वाजता रुळावरून घसरले. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. त्यानंतर रांचीहून दिल्लीला येणारी राजधानी एक्स्प्रेस दिल्लीच्या मिंटो ब्रिजजवळ रुळांवरून घसरली. गाडीचा वेग कमी असल्याने कोणाला दुखापत झाली नाही, मात्र गाडीच्या इंजीनचे मात्र नुकसान झाले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबईPuneपुणे