मुंबई - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुलाचे गर्डर उभारण्यास २२ ते २४ जानेवारी या काळात दुपारी १२ ते ३ यावेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या पुणे वाहिनीवरील वाहतूक वळवण ते वरसोली टोल नाका येथून देहूरोड मार्गे मार्गस्थ केली जाणार आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर डोंगरगाव आणि कुसगाव स्थानिक वाहतुकीसाठी उन्नत मार्ग उभारण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.
वाहतुकीचा वळण मार्ग दुपारी १२ ते ३ दरम्यान वळवण ते वरसोली टोल नाका येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ येथून देहूरोड मार्गे वाहतूक पुण्याकडे वळवणार. दुपारी ३ नंतर ही वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरून सोडण्यात येईल. या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.