शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मुंबईत उरलेत फक्त ६९ खड्डे, पालिका प्रशासनाचा दावा

By admin | Updated: July 15, 2016 19:53 IST

मुसळधार पावसाने मुंबईतील खड्ड्यांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 15 -  मुसळधार पावसाने मुंबईतील खड्ड्यांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या तक्रारींचे प्रमाण निम्म्यावर आले असल्याचा दाखला पालिका अधिकारी देत आहेत. मात्र खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ होत असल्याने मुंबईत फक्त ६९ खड्डे शिल्लक असल्याचा दावा पुन्हा एकदा पालिका प्रशासनाने केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई खड्ड्यात जात असते़ खड्डे चकाचक करण्यासाठी करोडो रुपये खर्च केल्यानंतरही यावर्षी मुंबईकरांना खड्ड्यांतूनच वाट काढावी लागत आहे़ तरीही मुंबईत केवळ ६६ खड्डे असल्याचा दावा आयुक्त अजोय मेहता यांनी पालिकेच्या महासभेत केला होता़ याचे तीव्र पडसाद उमटून राजकीय पक्षांनी आंदोलनच छेडले़ विरोधी पक्षासह महापालिकेत सत्तेवर भागिदारीत असलेल्या भाजपानेही मुंबईत खड्ड्यांची माहिती छायाचित्रांसह आयुक्तांना सादर केली़ मात्र आजही पालिका प्रशासन आपल्या मतावर ठाम आहे़ मुंबईत गुरुवारपर्यंत ९७७ खड्ड्यांच्या तक्रारी आल्या़ यापैकी ९०८ खड्ड्े बुजविण्याचे काम सुरु झाले़ उर्वरित ६९ खड्डे लवकरच बुजविण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली़ प्रतिनिधी चौकट आजचे खड्डे * खड्ड्यांच्या तक्रारी ९७७, खड्डे बुजविण्याची प्रक्रिया सुरु ९०८, शिल्लक खड्डे ६९़़ग़ेल्यावर्षी याच तारखेला मुंबईत १७८१ खड्डे होते़ यापैकी २३९ खड्डे बुजविणे शिल्लक होते़ सर्वाधिक खड्ड्यात गेलेले वॉर्ड * कुर्ला विभाग सर्वाधिक खड्ड्यात असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे़ ११२ तक्रारी या विभागातून आल्या आहेत़ त्यापाठोपाठ चेंबूर, मानखुर्द, गोवंडीचाही समावेश आहे़ * प्रभादेवी, वरळी अशा दक्षिण मध्य मुंबईतील रस्त्यांबरोबरच कुलाबा, चर्चगेट, फोर्ट, सीएसटी अशा अति महत्वाच्या विभागातील रस्ते सर्वाधिक खड्ड्यात आहेत़ येथील रस्त्यांवर ५८ खड्डे असल्याच्या तक्रारी आज दाखल झाल्या़ * पश्चिम उपनगरात अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ पश्चिमेकडील रस्ते सर्वाधिक खड्ड्यात आहेत़ एकूण ७० खड्ड्यांच्या तक्रारी आल्या आहेत़ यापैकी १५ खड्डे बुजविणे शिल्लक आहे़ विभागखड्ड्यांची संख्या शिल्लक खड्डे शहर३६९१६ पश्चिम उपनगर३०५३६ पूर्व उपनगर३०३१७ एकूण९७७६९ काँग्रेसची पॉटहोल दिंडी खड्ड्यांवर आतापर्यंत अनेक राजकीय आंदोलन झाली़ यामध्ये आज पॉटहोल दिंडीची भर पडली़ आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर काँग्रेसमार्फत ेफॅशन स्ट्रीट ते मुंबइ महापालिका मुख्यालयापर्यंत पॉटहोल दिंडी आज काढण्यात आली. शिवसेना भाजपाने रस्ते दुरुस्त करावेत नाहीतर सत्ता सोडून निघून जावे. युतीच्या नेत्यांना विठ्ठलाने सबुद्धी देण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी भजन, कीर्तन करीत दिंडी काढण्यात आली असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी सांगितले़ या आंदोलनानंतर येत्या १५ दिवसांत काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक विभाग कार्यालयावर धडकणार आहेत़ उरलेत फक्त ६९ खड्डे़़़पालिका प्रशासनाचा दावा मुंबई मुसळधार पावसाने मुंबईतील खड्ड्यांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत़ गतवर्षीच्या तुलनेत या तक्रारींचे प्रमाण निम्म्यावर आले असल्याचा दाखला पालिका अधिकारी देत आहेत़ मात्र खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ होत असल्याने मुंबईत फक्त ६९ खड्डे शिल्लक असल्याचा दावा पुन्हा एकदा पालिका प्रशासनाने केला आहे़ दरवर्षी पावसाळ्यात मुंबई खड्ड्यात जात असते़ खड्डे चकाचक करण्यासाठी करोडो रुपये खर्च केल्यानंतरही यावर्षी मुंबईकरांना खड्ड्यांतूनच वाट काढावी लागत आहे़ तरीही मुंबईत केवळ ६६ खड्डे असल्याचा दावा आयुक्त अजोय मेहता यांनी पालिकेच्या महासभेत केला होता़ याचे तीव्र पडसाद उमटून राजकीय पक्षांनी आंदोलनच छेडले़ विरोधी पक्षासह महापालिकेत सत्तेवर भागिदारीत असलेल्या भाजपानेही मुंबईत खड्ड्यांची माहिती छायाचित्रांसह आयुक्तांना सादर केली़ मात्र आजही पालिका प्रशासन आपल्या मतावर ठाम आहे़ मुंबईत गुरुवारपर्यंत ९७७ खड्ड्यांच्या तक्रारी आल्या़ यापैकी ९०८ खड्ड्े बुजविण्याचे काम सुरु झाले़ उर्वरित ६९ खड्डे लवकरच बुजविण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली़ प्रतिनिधी चौकट आजचे खड्डे * खड्ड्यांच्या तक्रारी ९७७, खड्डे बुजविण्याची प्रक्रिया सुरु ९०८, शिल्लक खड्डे ६९़़ग़ेल्यावर्षी याच तारखेला मुंबईत १७८१ खड्डे होते़ यापैकी २३९ खड्डे बुजविणे शिल्लक होते़ सर्वाधिक खड्ड्यात गेलेले वॉर्ड * कुर्ला विभाग सर्वाधिक खड्ड्यात असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे़ ११२ तक्रारी या विभागातून आल्या आहेत़ त्यापाठोपाठ चेंबूर, मानखुर्द, गोवंडीचाही समावेश आहे़ * प्रभादेवी, वरळी अशा दक्षिण मध्य मुंबईतील रस्त्यांबरोबरच कुलाबा, चर्चगेट, फोर्ट, सीएसटी अशा अति महत्वाच्या विभागातील रस्ते सर्वाधिक खड्ड्यात आहेत़ येथील रस्त्यांवर ५८ खड्डे असल्याच्या तक्रारी आज दाखल झाल्या़ * पश्चिम उपनगरात अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ पश्चिमेकडील रस्ते सर्वाधिक खड्ड्यात आहेत़ एकूण ७० खड्ड्यांच्या तक्रारी आल्या आहेत़ यापैकी १५ खड्डे बुजविणे शिल्लक आहे़ विभागखड्ड्यांची संख्या शिल्लक खड्डे शहर३६९१६ पश्चिम उपनगर३०५३६ पूर्व उपनगर३०३१७ एकूण९७७६९ काँग्रेसची पॉटहोल दिंडी खड्ड्यांवर आतापर्यंत अनेक राजकीय आंदोलन झाली़ यामध्ये आज पॉटहोल दिंडीची भर पडली़ आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर काँग्रेसमार्फत ेफॅशन स्ट्रीट ते मुंबइ महापालिका मुख्यालयापर्यंत पॉटहोल दिंडी आज काढण्यात आली. शिवसेना भाजपाने रस्ते दुरुस्त करावेत नाहीतर सत्ता सोडून निघून जावे. युतीच्या नेत्यांना विठ्ठलाने सबुद्धी देण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी भजन, कीर्तन करीत दिंडी काढण्यात आली असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी सांगितले़ या आंदोलनानंतर येत्या १५ दिवसांत काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक विभाग कार्यालयावर धडकणार आहेत़