शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

'माफी मागा, नाहीतर घरात घुसून मारू'; जावेद अख्तर यांना करणी सेनेची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 13:22 IST

सुप्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी गुरुवारी (2 मे) बुरखा बंदीवरही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र जावेद अख्तर यांच्या या विधानावर करणी सेनेने नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देसुप्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी बुरखा बंदीवरही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र जावेद अख्तर यांच्या या विधानावर करणी सेनेने नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवन सिंह सोलंकी यांनी 'तीन दिवसांत माफी मागा, नाहीतर तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारू' अशी धमकी दिली आहे.जावेद अख्तर यांच्या विधानावर करणी सेनेने नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई - सुप्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी गुरुवारी (2 मे) बुरखा बंदीवरही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बुरख्यावर बंदी घालण्याबरोबरच राजस्थानमधील घुंगटप्रथेवरही बंदी घालावी, महिला सक्षमीकरणासाठी ते आवश्यक आहे असं जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं. मात्र जावेद अख्तर यांच्या या विधानावर करणी सेनेने नाराजी व्यक्त केली आहे. माफी मागा, अन्यथा घरात घुसून मारू अशी धमकी महाराष्ट्र करणी सेनेने जावेद अख्तर यांनी दिली आहे. 

महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवन सिंह सोलंकी यांनी 'तीन दिवसांत माफी मागा, नाहीतर तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारू' अशी धमकी  जावेद अख्तर यांना दिली आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील करणी सेनेने पोस्ट केला आहे. 'आपल्या मर्यादा ओळखा. राजस्थान राज्याच्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करू नका. जावेद अख्तर यांनी त्यांच्या वक्तव्यासाठी तीन दिवसांत माफी मागावी, अन्यथा करणी सेनेच्या विरोधाला सामोरं जावं' असं या व्हिडीओत म्हटलं आहे.

बुरख्यावर बंदी घालण्याला आपला कोणताही आक्षेप नसून, केंद्र सरकारने राजस्थानात होत असलेल्या 6 मेच्या मतदानापूर्वी घुंगट प्रथेवरही बंदी घालावी, असे वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. मात्र, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे स्पष्टीकरण देत अख्तर यांनी दोन्हींवर बंदी घालण्याचं मत व्यक्त केलं होतं.

बुरख्यासोबतच घुंगटवरही बंदी घाला - जावेद अख्तरजावेद अख्तर यांनी 'बुरख्याबाबत माझे ज्ञान खूपच कमी आहे कारण ज्या घरात मी राहिलो त्या घरातील सर्व स्त्रिया या कामावर जाणाऱ्या होत्या. मी कधीही घरामध्ये बुरखा पाहिलेला नाही. इराक हा मोठा कट्टर देश आहे. मात्र, तिथे महिला आपला चेहरा झाकत नाहीत. श्रीलंकेत जो कायदा आला आहे, त्यानुसार तुम्ही तुमचा चेहरा झाकू शकत नाही. बुरखा वापरा, मात्र चेहरा झाकलेला असता कामा नये. हे त्यांनी कायद्यात अंतर्भूत केले' असं म्हटलं होतं.  

'येथे ( भारत) जर तुम्हाला कायदा (बुरखा परिधान करण्यावर प्रतिबंधासाठी) हवा असेल आणि जर कुणाचे तसे मत असेल तर मला त्याबाबत काहीही आक्षेप नाही. मात्र, राजस्थानमधील मतदान होण्यापूर्वी तेथे कुणीही घुंगट घालणार नाही अशी घोषणा केंद्र सरकारने करावी.  बुरखाबंदीही व्हावी आणि घुंगटबंदीही व्हावी असे मला वाटते', असं जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर आपलं म्हणणं चुकीच्या पद्धतीने मांडल्याचं सांगत अख्तर यांनी एक ट्वीट केलं होतं. 

'काही लोक माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी असे म्हटले होते की, श्रीलंकेत हे सुरक्षेच्या दृष्टीने केले गेले असेल, मात्र खरं तर हे महिला सक्षमीकरणासाठी गरजेचे आहे. चेहरा झाकणे बंद व्हायला हवे, मग तो नकाब असो वा घुंगट.' असं ट्वीट जावेद अख्तर यांनी शुक्रवारी पहाटे केलं होतं. 

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरMaharashtraमहाराष्ट्र