शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार, रेल्वे रूळावर पाणी जमून वाहतुकीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 12:05 IST

मुंबईमध्ये पूर्व-पश्चिम उपनगरात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे.

ठळक मुद्दे मुंबईमध्ये पूर्व-पश्चिम उपनगरात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे.मुंबईबरोबरच नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाने हजेरी लावली आहे

मुंबई, दि. 19- मुंबईमध्ये पूर्व-पश्चिम उपनगरात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळी रिमझिम पावसाला सुरूवात झाली होती. त्यानंतर पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईबरोबरच नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तसंच रायगडमधील उरण तालुक्यात गेल्या चार तासांपासून जोरदार पाऊस पडतो आहे. चिरनेर गावातील रस्त्यांवर दीड ते दोन फूट पाणी भरल्याची माहिती मिळते आहे. मुंबई पूर्व उपनगरांत पावसाचा जोर वाढला असून, भांडूप आणि कांजुर मार्गदरम्यान रेल्वे रुळावर पाणी आलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिट उशिराने होत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भांडूप ते कांजुरमार्ग मार्गदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी आल्याने, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिट उशाराने सुरु आहे.राज्यात आठवड्याच्या शेवटच्या म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. वेधशाळेच्या अंदाजानुसार विशेष म्हणजे मुंबई आणि उपनगरांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.

विदर्भात पावसाचं पुनरागमनविदर्भाच्या काही भागात शुक्रवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तसंच रविवारीसुद्धा विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागपूर शहरात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी रात्री तीन तासात 141.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजही विदर्भात सर्वत्र मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भंडाऱ्यातही पावसाने चांगली हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुलढाणा जिल्ह्यात शनिवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पावसामुळे सर्वसामान्य नागरिकही सुखावला आहे. अजून काही दिवस असाच पाऊस पडला तर बळीराजाच्या चिंता दूर होतील.