शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सामूहिक बलात्काराच्या किंकाळीने हादरतेय मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 01:34 IST

दर महिन्याला सामूहिक बलात्काराच्या किंकाळीने मुंबई हादरत असल्याची चिंताजनक बाब वर्षभराच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दर महिन्याला सामूहिक बलात्काराच्या किंकाळीने मुंबई हादरत असल्याची चिंताजनक बाब वर्षभराच्या आकडेवारीतून समोर आली आहे. मुंबईत १ एप्रिल २०१६ ते ३० मार्च २०१७पर्यंत सामूहिक बलात्काराचे तब्बल ११ गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेमुळे मुंबईत महिलांच्या सुरक्षेचे आव्हान कायम असल्याचे दिसून येत आहे.महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडून दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवूनही बलात्कार, छेडछाड, अश्लिल वर्तन, विनयभंग आणि हुंड्यासाठी छळ असे महिलांवर होणारे गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालल्याचे विदारक वास्तव पोलिसांकडे दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीतून समोर येत आहे.मुंबई शहर हे महिला आणि मुलींसाठी सुरक्षित असल्याचा दावा नेहमीच पोलिसांकडून करण्यात येतो. वास्तव मात्र वेगळेच असून शहरातील तब्बल ३३ टक्के महिलांना मुंबई असुरक्षित वाटत आहे. ही धक्कादायक माहिती एका स्वयंसेवी सस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यांत सामूहिक बलात्काराच्या घटनाही डोके वर काढत आहेत. २०१३मध्ये शक्ती मिल बलात्कार प्रकरणाने सर्वांनाच सुन्न केले. तपास यंत्रणांवर दबाब आणल्यानंतर या प्रकरणातील आरोपींना शिक्षाही ठोठाविण्यात आली.तरीदेखील मुंबईसारख्या मेट्रो सिटीत दर महिन्याला अल्पवयीन मुलींसह एक महिला सामूहिक बलात्काराची शिकार ठरत आहे. १ एप्रिल २०१६ ते ३० मार्च २०१७पर्यंत सामूहिक बलात्कार प्रकरणाचे तब्बल ११ गुन्हे मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये पश्चिम उपनगरातील ८ घटनांचा समावेश आहे.ओशिवारा (२), दहिसर, ट्रॉम्बे, पवई, जोगेश्वरी, एमएचबी, दिंडोशी, अंबोली, वाकोला, पायधुनी पोलीस आदी पोलीस ठाण्यांत या घटनांची नोंद करण्यात आली आहे. या घटनांमुळे आजही मुंबई पोलिसांसमोर महिलांच्या सुरक्षेचे आव्हान कायम असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.