शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलावरून श्रेयवादाची लढाई, मुख्यमंत्र्यांनी सांगूनही कार्यक्रर्त्यांनी केले उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:06 IST

अधिकृत कार्यक्रम करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगूनही विक्रोळीत शिंदे गटासह भाजप कार्यक्रर्त्यांनी उद्घाटन केले.

मुंबई: कोणताही अधिकृत कार्यक्रम न करता विक्रोळी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, शनिवारी या उड्डाणपुलावरून श्रेयवादाची लढाई जुंपल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे गटाने फीत कापून पुलाचे लोकार्पण केले. त्यानंतर काही वेळाने भाजपच्या वतीने उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिंदेसेना, उद्धवसेना आणि भाजपकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली, तर आपल्या पाठपुराव्यामुळे पुलाचे बांधकाम मार्गी लागले, असा दावा महाविकास आघाडीचे खासदार संजय पाटील यांनी केला.

पावसाळ्यात अनेकदा लालबहादूर शास्त्री मार्गावर बऱ्याच वेळा वाहतूक कोंडी होते आणि नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही बाब विचारात घेता कोणत्याही अधिकृत समारंभाची वाट न पाहता विक्रोळी रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय मी, तसेच माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे आणि तसे आदेशसुद्धा दिले आहेत, अशी पोस्ट शुक्रवारी फडणवीस यांनी समाजमाध्यमावर टाकली होती. त्याचबरोबर शनिवारी पूल वाहतुकीसाठी खुला करा, असे निर्देशही त्यांनी पालिका आणि वाहतूक विभागाला दिले होते.

दुपारी चारनंतर पूल अधिकृतरीत्या केला खुलामाजी महापौर आणि शिंदे गटात प्रवेश केलेले दत्ता दळवी, माजी नगरसेवक उपेंद्र सावंत आणि पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारीच उड्डाणपुलाकडे कूच केले. त्यानंतर दळवी यांच्या हस्ते फीत कापण्यात आली, तर १५ वर्षांपूर्वी खासदार संजय पाटील यांनी पुलाची मागणी केली होती. त्यासाठी त्यांना प्रशासकीय यंत्रणेशी वारंवार पाठपुरावा करावा लागला होता. मात्र, उशिरा का होईना त्यांच्या मागणीला यश आले, असे निवेदन त्यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले. दरम्यान, दुपारी चार वाजता पालिकेच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूल अधिकृतरीत्या वाहतुकीसाठी खुला केला.

स्टंटबाजी केल्याची टीका विमान दुर्घटनेमुळे देशात दुखवटा असून, विक्रोळी पुलाचे उद्घाटन न करता सार्वजनिक वाहतुकीसाठी तो खुला करण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केली होती. मात्र, त्यांच्या विनंतीचा मान न ठेवता भाजपच्या कार्यकर्त्यांनी विक्रोळी पुलाचे उद्घाटन ढोल, ताशाच्या गजरात केले. भाजपच्या कार्यकर्त्यांना विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे काहीही देणे-घेणे  नसून केवळ श्रेय लाटण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारची स्टंटबाजी केल्याची टीका संजय पाटील यांनी केली.

टॅग्स :MumbaiमुंबईDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस