शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 09:38 IST

Purushottam Chavan News: राज्य पोलिस दलातील आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत आणखी भर पडली

राज्य पोलिस दलातील आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. त्यांना ७.४२ कोटींच्या फसवणुकीच्या दुसऱ्या गुन्ह्यातही प्रोडक्शन वॉरंट मिळाले असून बुधवारी त्यांचा ताबा घेत पुढील तपास करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात २६३ कोटींच्या टीडीएस घोटाळ्यातही ईडीने चव्हाण यांना अटक केली होती. फेब्रुवारीत चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांविरोधात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबई, ठाणे आणि पुणे येथील शासकीय कोट्यातील घरे सवलतींत मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत २० जणांची २४ कोटी ७८ लाख रुपयांना फसवणुकीच्या गुन्ह्यात त्यांना यापूर्वी अटक केली होती. दाखल गुन्ह्यात करंदीकर यांचाही जबाब नोंदविण्यात आला. तपासात, करंदीकर यांच्या नावे असलेल्या बँक खात्यात दोन कोटी ६४ लाख रुपये आढळले. हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले, मात्र त्यात तोटा झाला. या बँक खात्यातील रकमेबाबतची माहिती मुख्यालयाला सादर केली होती. याबाबतही आर्थिक गुन्हे शाखेने पोलिस महासंचालक कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. हे बँक खाते देखील चव्हाण ऑपरेट करत असल्याचे समजते आहे.

आज ताबा घेणारसुरतच्या एका व्यावसायिकाला शासनाच्या अधिपत्याखालील भूखंड स्वस्तात देतो, असे सांगत ७.४२ कोटी उकळले. तसेच चव्हाण यांनी पोलिसांच्या नाशिक प्रशिक्षण अकादमीतील प्रशिक्षणार्थीसाठी टी-शर्टचे कंत्राट मिळवून देण्याचेही प्रलोभन त्याला दाखवले होते. व्यावसायिकाच्या तक्रारीनुसार, चव्हाणविरोधात दुसरा फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. पहिल्या गुन्ह्यात अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या चव्हाण यांना दुसऱ्या गुन्ह्यातही अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ६ जणांची ७.४२ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल दुसऱ्या गुन्ह्यात चव्हाण यांचे प्रोडक्शन वॉरंट घेण्यात आले आहे. बुधवारी त्यांचा ताबा घेण्यात येणार आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र