शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Mumbai Drug Case: नवाब मलिक यांनी बहिणीवर केलेल्या आरोपांमुळे क्रांती रेडकर संतप्त, म्हणाली त्या प्रकरणात माझी बहीण पीडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 15:35 IST

Mumbai Drug Case: Nawab Malik यांनी एका जुन्या प्रकरणाचा हवाला देत Sameer Wankhede यांची मेहुणी आणि Kranti Redkarच्या बहिणीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर क्रांती रेडकर हिनेही मलिक यांनी केलेल्या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे गेल्या महिनाभरापासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान, आज नवाब मलिक यांनी एका जुन्या प्रकरणाचा हवाला देत समीर वानखेडेंची मेहुणी आणि क्रांती रेडकरच्या बहिणीवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, समीर वानखेडे यांनी या प्रकरणात स्पष्टीकरण दिल्यानंतर आता क्रांती रेडकर हिनेही मलिक यांनी केलेल्या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच तिने प्रसारमाध्यमांनाही खडेबोल सुनावले आहेत.

यासंदर्भात केलेल्या एका ट्विटमध्ये क्रांती रेडकर म्हणते की, डियर मीडिया मला माहिती आहे की, नवाब मलिक यांच्या ट्विटर हँडलवर केलेल्या एका ट्विटमुळे तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. मात्र मी हे सांगू इच्छिते की, या प्रकरणात माझी बहीण पीडित होती आणि पीडित आहे. आमच्या लीगल टीमच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याने असल्याने यावर प्रतिक्रिया देणे हा समजुतदारपणा ठरणार नाही. माझी बहीण मलिक यांच्या ट्विट विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. मात्र समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आहे.

त्याआधी समीर वानखेडे यांनीही मलिक यांनी केलेल्या या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.  नवाब मलिक उल्लेख करत असलेलं प्रकरण जवळपास १३-१४ वर्ष जुनं आहे. क्रांती रेडकरच्या बहिणीवर ड्रग्ज प्रकरणात कारवाई झाली तेव्हा माझा आणि क्रांती रेडकरचा विवाहदेखील झाला नव्हता. तसेच मी त्यावेळी एनसीबीच्या नोकरीतही नव्हतो. मग त्याचा काय संबंध?, असा सवाल उपस्थित करत समीर वानखेडे यांनी मलिकांनी केलेल्या आरोपांची हवा काढून टाकली आहे.

आज नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंची मेहुणी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरच्या बहिणीवर गंभीर आरोप केले होते. समीर दाऊद वानखेडे तुमची मेहुणी ड्रग्सच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला होता. समीर वानखेडे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अवश्य द्यावं लागेल, कारण या प्रकरणातील खटला पुण्यातील कोर्टामध्ये प्रलंबित आहे. तसेच खालील कागदपत्रे त्याचा पुरावा आहे, असा दावा मलिक यांनी केला होता. 

टॅग्स :Kranti Redkarक्रांती रेडकरnawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडेPoliticsराजकारण