शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

एसटी सेवा हळूहळू मार्गावर; २ दिवसांत वाढल्या हजार गाड्या, ५० टक्के कर्मचारी रुजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 06:13 IST

गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, आता कर्मचारी कामावर रुजू होत असल्याने एसटीच्या फेऱ्या वाढल्या आहेत.

मुंबई :

गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, आता कर्मचारी कामावर रुजू होत असल्याने एसटीच्या फेऱ्या वाढल्या आहेत. सध्या ७ हजार गाड्या सुरू असून,  प्रवासीसंख्या १५ लाखांपर्यंत गेली आहे. एसटी हळूहळू रुळावर येत आहे. येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या संख्येने कर्मचारी रुजू होतील, अशी माहिती आहे.

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली. 

प्रवासीसंख्येत अडीच लाखांची वाढ पाच महिन्यांनंतर एसटीमध्ये कर्मचारी रुजू होण्याचा आकडा वाढला आहे. १३ एप्रिलपर्यंत सहा हजार गाड्या सुरू होत्या. मात्र, दोन दिवसांत त्यात एक हजारांची वाढ झाली असून, त्या सात हजार झाल्या आहेत, तर प्रवासीसंख्येत अडीच लाखांची वाढ झाली आहे. उत्पन्न पाेहाेचले दहा कोटींपार - कोरोनापूर्व काळात दररोज ६५ लाख प्रवासी एसटीने प्रवास करत होते. महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून उत्पन्न २१ कोटी मिळत होते. - कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतूक अंशतः सुरू होती. - कर्मचारीसंख्या वाढल्यानंतर आता ७ हजार गाड्या सुरू झाल्याने उत्पन्नाचा आकडा १० कोटींच्या पार गेला आहे.४५००० कर्मचारी परतलेएसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांचा संप सुरू होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर  मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. आतापर्यंत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा ४५ हजारांपर्यंत पोहोचला आहे.न्यायालयाच्या निर्णयानंतर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात विविध ठिकाणी असलेल्या जत्रांच्या पार्श्वभूमीवर गाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आता ७ हजार गाड्या सुरू असून, त्याला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.     - शेखर चन्ने,  उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

टॅग्स :ST Strikeएसटी संप