शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड होणार, पगारासाठी राज्य सरकारकडून ३०० कोटींचा निधी वितरीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 17:30 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड होणार आहे. कारण रखडलेला पगार अखेर मिळणार आहे.

मुंबई-

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड होणार आहे. कारण रखडलेला पगार अखेर मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी रुपये निधी राज्य सरकारकडून वितरीत करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पगारावरुन पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारनं तातडीनं हे पाऊल उचललं आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून एक परिपत्रक देखील जारी करण्यात आलं आहे. 

सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तीनशे कोटी रुपये वितरीत केले आहेत. यात कर्मचाऱ्यांचा फक्त नेट पगार होईल, त्यात गॅच्युटी, पीएफचे पैसे भरले जाणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे. तसंच कर्मचाऱ्यांचा आजच पगार होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी सरकारने ३०० कोटी निधी वितरित केलेला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार आता होणार आहे. या निधीतून त्यांच्या बँकेत मूळ वेतनाची रक्कमच जमा होणार आहे.

एसटी संप काळात कर्मचाऱ्यांचे वेतन सात ते 10 तारखे दरम्यान देण्याचं आश्वासन राज्य सरकारने कोर्टात दिलं होतं. मात्र तरीही गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर पगार होत नाही. यामध्ये याही महिन्यात १२ तारीख उलटली तरीही पगार न झाल्याने कर्मचारी संतप्त होते. एसटी कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. 

सरकारनं दिलेली रक्कम अपुरीएसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारनं ३०० कोटी रुपये दिले असले तरी दिलेली रक्कम अपुरी असल्याचं काँग्रेस प्रणित एसटी संघटनेचे म्हणणे आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत व्हावा यासाठी दरमहा ३६० कोटी रुपये देणे गरजेचे आहे. तशी हमी राज्य सरकारने कोर्टात दिली होती. तरीही दर महिन्याला सरकारकडून अपुरा निधी दिला जात आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांची थकलेली देणी १ हजार २०० कोटींच्या घरात गेली आहे. 

टॅग्स :ST Strikeएसटी संप