शिर्डीच्या विमानतळास श्री साईबाबांचे नाव,  दोन दिवसांत निर्णय अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:27 AM2017-08-23T01:27:04+5:302017-08-23T01:29:53+5:30

शिर्डी येथील नवीन विमानतळाचे नामकरण श्री साईबाबा शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात येणार आहे. याबाबत राज्य शासन येत्या एक-दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mr. Saibaba's name is expected in Shirdi airport, decision is expected in two days | शिर्डीच्या विमानतळास श्री साईबाबांचे नाव,  दोन दिवसांत निर्णय अपेक्षित

शिर्डीच्या विमानतळास श्री साईबाबांचे नाव,  दोन दिवसांत निर्णय अपेक्षित

googlenewsNext

- विशेष प्रतिनिधी ।

मुंबई : शिर्डी येथील नवीन विमानतळाचे नामकरण श्री साईबाबा शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात येणार आहे. याबाबत राज्य शासन येत्या एक-दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीने या विमानतळाची उभारणी केली आहे. त्यासाठी ३५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, आतापर्यंत जवळपास ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. इतक्या कमी खर्चात इतके सुंदर विमानतळ उभारल्याबद्दल नागरी उड्डयण विभाग आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी विमानतळास दिलेल्या भेटीत प्रशंसा केली होती.
या विमानतळाचे नामकरण श्री साईबाबा शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्याची विनंती श्री साईबाबा संस्थानने ठरावाद्वारे राज्य शासनास केली होती. राज्य शासन याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय घेऊन तो अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविणार आहे.

सुरुवातीला सूर्यास्तापर्यंतच
शिर्डीच्या विमानतळावरून सुरुवातीला दोन महिने सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतच विमानांची ये-जा होणार आहे. त्यानंतर २४ तास विमानसेवा चालू करण्यात येईल.
सप्टेंबरपासून उड्डाण?
या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. उड्डाणासाठीचा परवाना ३१ आॅगस्टपर्यंत द्यावा, अशी विनंती एमएडीसीने विमानतळ प्राधिकरणाकडे केली आहे. श्री साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षास येत्या आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या वर्षात जगाच्या कानाकोपºयातून हजारो भाविक या ठिकाणी येणार आहेत.

Web Title: Mr. Saibaba's name is expected in Shirdi airport, decision is expected in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.