शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

MPSC: एमपीएससी परीक्षा; विद्यार्थ्यांकडे आढळले हेडफोन, गुन्हा दाखल

By उज्वल भालेकर | Updated: June 1, 2025 19:27 IST

MPSC: ३४ केंद्रावर ७ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी संयुक्त गट-क पूर्व परीक्षा दिली.

उज्वल भालेकर, अमरावती: एमपीएससी गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मध्ये शहरातील ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय या परीक्षा उपकेंद्रावर गैरप्रकार झाल्याचा प्रकार घडला. येथे परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्यांकडे हेडफोन आढळून आला आहे. परीक्षा सुरु झाल्यानंतर १५ ते २० मिनिटांनी आपल्याकडे चुकून हेडफोन राहिल्याचे विद्यार्थ्यानेच पर्यवेक्षकांना सांगत ते जमा केले. परंतु परीक्षा हॉलमध्ये कोणतेही इलेक्ट्रिक गॅजेट किंवा मोबाइल नेण्यास बंदी असतानाही विद्यार्थ्याने हेडफोन नेल्याचा ठपका ठेवत या विद्यार्थ्यांवर राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ‘गट क’ संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन रविवार दि. १ जून रोजी करण्यात आले होते. शहरातील ३४ उपकेंद्रावर या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. या केंद्रावर तब्बल १० हजार ३७८ परीक्षार्थी परीक्षेसाठी पात्र होते. सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत ही परीक्षा पार पडली. यावेळी प्रत्यक्षात ७ हजार ७२३ विद्यार्थी हे परीक्षेला हजर होते. तर २ हजार ६५५ विद्यार्थी हे विविध कारणांनी परीक्षेला गैरहजर राहिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सर्वच केंद्रावर परीक्षा सुरळीत परीक्षा पार पाडण्यासाठी तब्बल १ हजार १५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. परंतु यानंतरही शहरातील ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय येथील केंद्रावर एका विद्यार्थ्याकडे हेडफोन आढळल्याने त्यावर एमपीएससीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाMaharashtraमहाराष्ट्रexamपरीक्षा