शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

खासदारकी तर गेली, आता निदान आमदारकीची इच्छा तरी पूर्ण करा; विधानसभेसाठी पराभूत खासदारांची भाऊगर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 09:03 IST

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून यावेळी काँग्रेसने माजी खा. प्रिया दत्त यांच्याऐवजी आ. वर्षा गायकवाड यांना तर भाजपने माजी खा. पूनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्याविरोधात वांद्रे पश्चिममधून काँग्रेसने प्रिया दत्त यांना उमेदवारी देण्याचे ठरविले आहे. 

महेश पवार -मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये संधी नाकारण्यात आलेले आणि पराभूत झालेल्या मुंबईतील काही माजी खासदारांनी आपली पावले आता विधानसभेच्या दिशेने वळवली आहेत. विधानसभेची उमेदवारी मिळवून आमदार होण्यासाठी हे माजी खासदार जोरदार प्रयत्न करत आहेत. यात प्रामुख्याने गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, संजय निरूपम, राहुल शेवाळे, प्रिया दत्त यासारख्या माजी खासदारांचा समावेश आहे.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून यावेळी काँग्रेसने माजी खा. प्रिया दत्त यांच्याऐवजी आ. वर्षा गायकवाड यांना तर भाजपने माजी खा. पूनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्याविरोधात वांद्रे पश्चिममधून काँग्रेसने प्रिया दत्त यांना उमेदवारी देण्याचे ठरविले आहे. 

२००९च्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तरमधून काँग्रेसचे संजय निरूपम यांनी भाजपचे राम नाईक यांचा पराभव केला होता. मात्र, २०१४ मध्ये त्यांना भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी पराभूत केले. निरूपम सध्या शिंदेसेनेत असून, त्यांनी दिंडोशी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.

दक्षिण मध्य मुंबईतून शिंदेसेनेचे राहुल शेवाळे हे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, यावेळी उद्धवसेनेचे अनिल देसाई यांच्याकडून ते पराभूत झाले. चेंबूरमधून शिंदेसेनेचे उमेदवार म्हणून शेवाळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

पूनम महाजन यांचे काय? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने मनोज कोटक (मुंबई उत्तर पूर्व), पूनम महाजन (मुंबई उत्तर मध्य) आणि गोपाळ शेट्टी (मुंबई उत्तर) यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. ज्या खासदारांना तिकीट नाकारले त्यांना विधानसभेत उमेदवारी देण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना दिल्लीमधून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेट्टी यांनी बोरिवली आणि कोटक यांना मुलुंडमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर पूनम महाजन यांच्याबाबत अद्याप काही निर्णय झालेला नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे पूनम महाजन काय निर्णय घेणार, याकडेही लक्ष लागले आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024