शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

‘सैराट’ चित्रपटातील संवादाला महिला दिग्दर्शिकेची हरकत

By admin | Published: May 13, 2016 2:12 AM

‘सैराट’ चित्रपटात आक्षेपार्ह संवाद असल्याने दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांनी ते काढून टाकावे आणि अशा संवादांबद्दल माफी मागावी, अशी मागणी चित्रपट दिग्दर्शिका प्रणिता पवार यांनी केली आहे

कल्याण : सध्या सर्वत्र गाजत असलेल्या ‘सैराट’ चित्रपटात आक्षेपार्ह संवाद असल्याने दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांनी ते काढून टाकावे आणि अशा संवादांबद्दल माफी मागावी, अशी मागणी चित्रपट दिग्दर्शिका प्रणिता पवार यांनी केली आहे. या प्रकरणी मंजुळे यांना कायदेशीर नोटीस बजावल्याची माहिती त्यांनी दिली. पवार यांच्या भूमिकेला शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पवार यांची मागणी रास्त असल्याचे म्हणत आक्षेपार्ह संवाद चित्रपटातून त्वरित वगळावे, असे स्पष्ट केले आहे.पवार यांची स्वत:ची प्रॉडक्शन संस्था आहे. त्यांनी ‘माझं नाव शिवाजी’ नावाचा चित्रपट तयार केला आहे. चित्रपटातील हा संवाद म्हणजे स्त्रियांचा अपमान आहे. त्यामुळे चित्रपटातून संवाद काढण्याची मागणी पवार यांनी केली. या प्रकरणी त्यांनी कल्याणच्या एम्पॉवर वुमेन्स वेल्फेअर संस्थेकडे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्या आशा रसाळ यांच्याकडे धाव घेतली. रसाळ आणि पवार यांनी गुरुवारी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याकडे हा मुद्दा मांडला आणि तो त्यांनीही उचलून धरला. त्यानंतर, मंजुळे यांना संवाद काढण्याबाबत कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. तो न काढल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. या नोटिशीची प्रत सेन्सॉर बोर्डालाही दिली आहे. (प्रतिनिधी)‘सैराट’ चित्रपटात शिक्षकाच्या तोंडी महिलेचा अवमान करणारे संवाद आहेत. मराठी जनांवर चिखलफेक करणारे संवाद शिक्षकाच्या तोंडी आहेत. आपल्याला एखादा संवाद पटत नसेल, तर तो नाकारण्याचा अधिकार भूमिका करणाऱ्याला असतो.शिक्षकाची भूमिका करणाऱ्या कलावंताने हा संयम पाळलेला नाही. चित्रपटातील या वाक्यावरून ‘मुलगी ही भोगवस्तू असून तिला वापरून सोडून द्या,’ असा संदेश समाजात पसरवला जात आहे. पवार यांच्या भूमिकेला शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पवार यांची मागणी रास्त असल्याचे म्हणत आक्षेपार्ह संवाद चित्रपटातून त्वरित वगळावे, असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी त्यांनी कल्याणच्या एम्पॉवर वुमेन्स वेल्फेअर संस्थेकडे धाव घेतली आहे.