शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा खांब बाजुला करा...! मागणीसाठी पोलवर खाट बांधून नागरिकाचे उपोषण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:40 IST

अमरावतीत एका अनोख्या उपोषणाची चर्चा रंगू लागली आहे. चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी येथील ही घटना आहे.

महावितरण हे असे खाते आहे, जे पैसे मिळाले तरच काम करते. म्हणजे रस्त्यात खांब येतोय, तो हटवायला देखील पैसे भरावे लागतात. घरावरून लाईन जातेय, पैसे भरले तरच ती लाईन थोडी वाकडी करून नेली जाते. लोकांच्या जिवावर उठेल याचे या खात्याला काहीच नसते. अशाच एका खांबाच्या स्थलांतरासाठी एका नागरिकाने चक्क खांबावरच खाट बांधून उपोषण केले आहे. 

अमरावतीत एका अनोख्या उपोषणाची चर्चा रंगू लागली आहे. चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी येथील ही घटना आहे. इलेक्ट्रिकचा खांब रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी विलास चर्जन यांनी चक्क इलेक्ट्रिक पोलवर खाट बांधून जीव धोक्यात घालत उपोषण केले आहे. 

वारंवार इलेक्ट्रिक पोल काढण्यासंदर्भात तक्रारी करून देखील पोल हटवण्यात न आल्याने चर्जन यांनी अनोख्या उपोषणाला सुरुवात केली. इलेक्ट्रिकच्या पोलवर खाट बांधून त्यावर बसत त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणामुळे प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न सोनोरीत उपस्थित करण्यात येत आहे. 

अनेक ठिकाणी खांब रस्त्यातच असतात...गावागावात अनेक ठिकाणी विजेचे पोल हे रस्त्यातच उभारलेले असतात. वाड्या वाड्यांना जाण्यासाठी काही वेळा नवीन रस्ते केला जातात. तेव्हा त्यात खांब येतात. आधीच्याच रस्त्यांवर काहीवेळा हे खांब उभे असतात. परंतू, ते हटवून रस्त्याच्या बाजुला उभारण्याची तसदी घेतली जात नाही. कोणाच्या शेतात मधोमध खांब असतो. हे खांब बाजुला करण्यासाठी महावितरण कडून पैसे आकारले जातात. लोकांच्या जिवाचा विचार केला जात नाही, असा आरोप वेळोवेळी लोक करत असतात. 

टॅग्स :mahavitaranमहावितरण