शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

धूरक्याने अडविली वाट, धूळ आणि धुके यांच्या मिश्रणाने मुंबईकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 04:49 IST

मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात झालेल्या घसरणीमुळे शहरातील गारठ्यात वाढ झाली असतानाच, दुसरीकडे शनिवारी सकाळी धूळ आणि धुके यांच्या मिश्रणामुळे वातावरणात तयार झालेल्या धूरक्याचा मुंबईच्या दैनंदिन व्यवहारांवर विपरीत परिणाम झाला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात झालेल्या घसरणीमुळे शहरातील गारठ्यात वाढ झाली असतानाच, दुसरीकडे शनिवारी सकाळी धूळ आणि धुके यांच्या मिश्रणामुळे वातावरणात तयार झालेल्या धूरक्याचा मुंबईच्या दैनंदिन व्यवहारांवर विपरीत परिणाम झाला. विशेषत: सकाळपासून मुंबईच्या वातावरणात पसरलेले धूरके सायंकाळपर्यंत कायम राहिले होते. या धूरक्याचा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला बसला. शनिवारी सकाळी रस्ते व रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर, मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत असून, किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत आहे. मध्यंतरी पडलेल्या पावसाने यात भर घातल्याने तापमान खाली घसरले आहे. याचा परिणाम म्हणून गारठ्यात वाढ झाली आहे.पहाटे पसरलेल्या धूरक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. याचा परिणाम म्हणून सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. रस्ते वाहतुकीलाही याचा फटका बसला. धूरक्यामुळे पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. बोरीवली-दहिसर लिंक रोडही याला अपवाद नव्हता.मुंबईप्रमाणेच राज्याच्या प्रमुख शहरांच्या किमान तापमानात शनिवारी चढउतार नोंदविण्यात आले. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे १३.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.उद्या किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्वातावरणाच्या खालच्या स्तरात धूळ आणि धुके यांच्या मिश्रणामुळे धूरक्यात वाढ झाली आहे. धुळीच्या कणांचे वाढते प्रमाण व वातावरणातील इतर घटक यास कारणीभूत आहेत.रविवारसह सोमवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, २२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला.आर्द्रता वाढली कुलाबा वेधशाळेत आर्द्रतेचे प्रमाण ९४ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे. तर सांताक्रुझ वेधशाळेत आर्द्रतेचे प्रमाण ९५ टक्के नोंदविले आहे. आर्द्रता वाढण्यासह अरबी समुद्रावरील वातावरणातील ओलाव्याचे प्रमाण वाढले आहे. धुके वाढण्यामागचे हेदेखील एक कारण असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबईpollutionप्रदूषण