शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या पिंडदानास गेलेल्या आईसह दोन मावस बहिणींचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 08:02 IST

Gondia News: लहान मुलाच्या पिंडदानासाठी कोरणी घाट येथे गेलेल्या आई व दोन मावस बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मीरा इसूलाल तुरकर (५५), मीनाक्षी संतोष बघेले (३६) व स्मिता शत्रुघ्न टेंभरे (३९, तिघी रा.नागपूर), अशी मृत महिलांची नावे आहेत.

गोंदिया - लहान मुलाच्या पिंडदानासाठी कोरणी घाट येथे गेलेल्या आई व दोन मावस बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मीरा इसूलाल तुरकर (५५), मीनाक्षी संतोष बघेले (३६) व स्मिता शत्रुघ्न टेंभरे (३९, तिघी रा.नागपूर), अशी मृत महिलांची नावे आहेत.

मीरा तुरकर यांचा लहान मुलगा मुकेश तुरकर याचे ३० मे रोजी आजाराने निधन झाले. पिंडदानासाठी तालुक्यातील कोरणी घाट येथे रविवारी कुटुंबीय आले होते. पूजेपूर्वी अंघोळीसाठी महिला घाटात उतरल्या. मुकेश तुरकरची वहिनी गायत्री राजेश तुरकर या पाय घसरल्याने पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली. चौघी बुडत असल्याचे पाहून पिंडदानाच्या प्रक्रियेतील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गायत्री यांना वाचविण्यात यश आले. इतर तिघींचा बुडून मृत्यू झाला. मीरा तुरकर यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून आणि नातवंडे आहेत. तिघी मृतक गोंदिया जिल्ह्यातील गिरोला-कन्हारटोला येथील मूळच्या रहिवासी आहेत. रोजगाराच्या शोधात त्या नागपूर हिंगणा येथे गेल्याने काही वर्षांपासून तेथेच वास्तव्यास होत्या.

गोदापात्रात बुडालेल्या ६ मुलांचे मृतदेह आढळलेसिरोंचा (जि. गडचिरोली) : तेलंगणाच्या हद्दीतील मेडीगड्डा धरणाजवळ गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी उतरलेली सहा मुले बुडाल्याची घटना शनिवारी घडली. मच्छीमारांच्या मदतीने पोलिसांनी शोधमोहीम राबविल्यानंतर रविवारी त्यांचे मृतदेह आढळून आले. सहाही मृत मुले तेलंगणातील रहिवासी होते. पोलिस व आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने बोटीद्वारे मुलांचा शोध सुरु केला. सकाळी ७ वाजता मृतदेह नदीपात्रात काही अंतरावर आढळून आले. 

टॅग्स :Accidentअपघात