शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झाल्याने मातेचा मृत्यू, बाळ सुखरूप; हलगर्जीपणाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 07:09 IST

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला

रवींद्र साळवे 

मोखाडा : अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील आरोग्य सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असल्याचे वास्तव पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. एका गर्भवती मातेला प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याची घटना मोखाड्यात घडली आहे, परंतु डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

मोखाडा तालुक्यापासून १५ किमी अंतरावर असलेल्या कोलद्याचा पाडा येथील आशा नंदकुमार भुसारे (वय २२) हिला प्रसूतीसाठी २५ डिसेंबरला पहाटे मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु दिवसभर कोणताही उपचार न करता डिलिव्हरी पेशंटला इथून तिथून ये-जा करण्यास सांगितले. यानंतर आता प्रसूती होईल, नंतर होईल, यामध्ये दुसरा दिवस उलटल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर  २६ तारखेला सकाळी ९:०० वाजेच्या दरम्यान प्रसूती होऊन या मातेने बालकाला जन्म दिला, त्यानंतर रक्तस्त्राव होऊ लागला. एक तास रक्तस्त्राव सुरू असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर पुढील उपचारासाठी तिला जव्हार कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे तिला चार बाटल्या रक्त देण्यात आले. तरीदेखील रक्तस्त्राव सुरूच होता. पुढील उपचारासाठी नाशिक सिव्हिल येथे पाठवण्यात आले. यावेळी अर्ध्या रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.  

माझ्या पत्नीची डिलिव्हरी नॉर्मल झाली, परंतु यानंतर डॉक्टर, नर्स यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यानेच रक्तस्त्राव झाला आहे. रक्तस्त्राव झाल्यानंतरही खूप विलंब लावला. वेळीच आमचा पेशंट सिव्हिल रुग्णालयात पोहचला असता तर वाचला असता. याची योग्य ती चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.- नंदकुमार भुसारे, मृत महिलेचे पती.

प्रसूती झाल्यानंतर काही वेळाने गर्भपिशवी कडक होणे गरजेचे असते अन्यथा रक्तस्त्राव सुरू होतो. या मातेची गर्भपिशवी कडक न झाल्याने तिला रक्तस्त्राव सुरू झाला. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी प्रयत्न केले. तिला तत्काळ रक्ताच्या बॉटलही देण्यात आल्या, परंतु तिचा रक्तस्त्राव थांबत नव्हता. यावेळी गर्भपिशवीचे ऑपरेशन करणे, गर्भपिशवी काढून टाकणे, या शस्त्रक्रिया कराव्या लागतात, परंतु आपल्याकडे अद्ययावत सुविधा नसल्याने नाशिक सिव्हिलला पाठवण्यात आले, परंतु तिचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला.- डॉ. भरत महाले, वैद्यकीय अधीक्षक, मोखाडा ग्रामीण रुग्णालय. 

टॅग्स :palgharपालघरdoctorडॉक्टर