लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी (पुणे) : चार वर्षांच्या मुलीचा गळा दाबून आईनेही घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडे आठच्या सुमारास इंद्रायणीनगर, भोसरी येथे उघडकीस आली. घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमोदी इसापन (वय २५, रा. सध्या भोसरी, मूळ केरळ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी तिने चार वर्षांच्या देवाश्री या पोटच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. तसेच तिला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटवून ठेवले होते. कोमोदीचे पती चाकण येथील एका कंपनीत कामाला जातात. नेहमीप्रमाणे ते सकाळी साडे सातला कंपनीत गेले. त्यानंतर काही वेळाने त्यांना मोबाइलवर घरी घडलेल्या प्रकाराची माहिती मिळाली.
पिंपरी येथे मुलीची हत्या करून आईची आत्महत्या
By admin | Updated: June 22, 2017 05:07 IST