शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

क्रांतिकारी भूमीत शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या, आपच्या राज्यव्यापी शेतकरी, शेतमजूर परिषदेत प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 20:01 IST

महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुखांनी विचाराची ज्योत पेटवून ती देशपातळीवर तेवत ठेवली. मात्र आजमितीला शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे क्रांतिकारी भूमीतच शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असल्याची खंत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय नेते आशुतोष यांनी रविवारी येथे व्यक्त केली.

अमरावती - महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुखांनी विचाराची ज्योत पेटवून ती देशपातळीवर तेवत ठेवली. मात्र आजमितीला शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे क्रांतिकारी भूमीतच शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असल्याची खंत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय नेते आशुतोष यांनी रविवारी येथे व्यक्त केली.आपच्या वतीने अमरावतीत आयोजित राज्यव्यापी शेतकरी, शेतमजूर परिषदेला ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पुढे बोलताना आशुतोष यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर तोफ डागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारावेळी शेतक-यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप त्यांनी केला. अवेळी पाऊस, सतत नापिकी, शेती उत्पादनाला भाव नाही, असा वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी त्रस्त होऊन आत्महत्या करीत असल्याची बाब त्यांनी उपस्थित केली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजही अन्नदात्याला आत्महत्या करावी लागत असेल, तर ती राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद आहे.केंद्र सरकार विकासाच्या नावाने विविध प्रकल्पांची पायाभरणी करीत असले तरी या विकासाच्या आर्थिक सुधारणेत शेतक-यांना कुठेही स्थान नाही. देशात झपाट्याने प्रगती केली, हा गवगवा केला जात असून शेतक-यांसाठी सिंचन, शिक्षण, आरोग्य आदी मूलभूत सुविधा का पुरविली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने उद्योजकांचे ४.५० लाख कोटींचे कर्ज माफ केले तर शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी सकारात्मक भूमिका का घेतली जात नाही, ही बाब त्यांनी उपस्थित केली. केंद्र सरकार हे सत्ता आणि संपत्तीच्या बळावर चालत असून मोदी, शहा, अंबानी व अदानी यांच्या भयातून देशमुक्त करावा लागेल, अशी भावनिक साद त्यांनी घातली. देशाला सत्ता, संपत्तीच्या भयातून मुक्त करण्यासाठी आपच्या वतीने दिल्ली येथे २६ नोव्हेंबर २०१७ रोजी रामलीला मैदानावर होणा-या मेळाव्यात उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आशुतोष यांनी केले. यावेळी मंचावर आपचे नेते रंगा राचुरे, ब्रिगेडियर सुधीर सावंत, गजानन अमदाबादकर, चंद्रकांत वानखडे, पंकज गुप्ता, प्रिती शर्मा-मेमन, आलोक अग्रवाल आदी उपस्थित होते.- तर शिल्पा शेट्टी हिने आत्महत्या का केली नाही?दारू पिण्याचे प्रमाण हे चित्रपटसृष्टीत अधिक आहे. तरीदेखील शिल्पा शेट्टी हिने दारू पिऊन कधी आत्महत्या केली नाही, अशी बोचरी टीका शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे यांनी केंद्र सरकारवर केली. काही दिवसांपूर्वीे लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी शेतकरी दारू प्राशनाने आत्महत्या करीत असल्याचे उद्गार काढले होते, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. केंद्र सरकार सीमेवर रक्षण करणा-या सैनिकाला अनुदानातून अधिकृत दारू देते तर, अन्न सुरक्षा करणा-या शेतक-यांना वेगळा न्याय का, असा सवाल वानखडे यांनी उपस्थित केला. चित्रपटसृष्टी, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार हेसुद्धा दारू पितात. यापैकी कोणीही दारू पिऊन आत्महत्या केल्या नाहीत. परंतु शेतकरीच का दारू पिऊन आत्महत्या करतो? याचे चिंतन सगळ्यांनाच करावे लागेल. त्यामुळे आता राजकीय पर्याय उभा करावा लागेल, ही बाब त्यांनी आवर्जून मांडली.