शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

राज्यात कोल्हापूरमध्ये डेंग्यूचे रुग्ण अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 12:21 IST

पुरामुळे वाढली तीव्रता : पुणे अन् ठाण्यात फैलाव जास्त

ठळक मुद्देराज्यात गेल्या वर्षीपासूनच डेंग्यू ठाण मांडून सर्व पातळ्यांवर प्रशासनाचे प्रयत्न सुरू.

पुणे : राज्यात डेंग्यूचे थैमान सुरूच असून दिवसागणिक या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यातल्या आठ प्रमुख विभागांपैकी कोल्हापूरमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक असून त्यानंतर पुणे आणि ठाणेचा क्रमांक आहे. राज्यात गेल्या वर्षीपासूनच डेंग्यू ठाण मांडून बसला आहे. यंदाच्या वर्षी पावसाच्या रौद्ररूपाने त्यात अधिकच भर पडली. अतिवृष्टीमुळे कोल्हापूरला पुराचा फटका बसला. पुरामुळे त्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागात १६३० इतकी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झाली असून,  त्याखालोखाल पुण्यात १४६२ आणि ठाणे विभागामध्ये १३०३ इतकी रुग्णसंख्या आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत ६३९० जणांना डेंग्यूची लागण झाली आहे, तर चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.  डॉ. आवटे म्हणाले, की गेल्या वर्षीदेखील राज्यात कोल्हापूर विभागात डेंग्यूचा उद्रेक होता. ही संख्या १७०१ एवढी होती. यावर्षीही ही संख्या तेवढीच आहे. अतिवृष्टीमुळे कोल्हापूरमधील काही भागांना पुराचा फटका बसल्यामुळे डेंग्यूचा फैलाव  झाला आहे. खाचखळग्यांमध्ये पाणी साचण्यामुळे तिथेच डासांची पैदास होते. डेंग्यूचा डास हा घरात व आसपासच्या भागात साठवून ठेवलेल्या स्वच्छ पाण्यातही होतो. त्यामुळे पाऊस अनियमित झाला आणि दुष्काळ जरी पडला तरी पाणी साठवून ठेवण्यामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास होते. शहरी भागात डेंग्यू आहेच, पण ग्रामीण भागाचेही शहरीकरण झाल्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढते आहे. यासाठी आरोग्य विभागातर्फे दोन प्रकारची सर्वेक्षणे केली जातात. त्यातील एक ताप रुग्ण आहे. घरोघरी जाऊन तापाचे रुग्ण आहेत का? याची पाहणी केली जाते. दुसरे महत्त्वाचे सर्वेक्षण आहे ते म्हणजे घराघरात जाऊन पाणी साठवण्याची भांडी पाहिली जातात, की कुठे डेंग्यूच्या डासाच्या अळ्या आहेत का?  याशिवाय डासांची उत्पत्तीक्षेत्रे आहेत त्याचेही सर्वेक्षण करून यादी तयार केली जाते. छोटे तलाव, पावसामुळे खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी याची पाहणी करून त्यात रसायन टाकणे, गप्पी मासे सोडणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत. रुग्णांचे कार्यस्थळ याच्यावरही लक्ष ठेवले जाते. कुणाच्या मालकीच्या घरात डासांची उत्पत्ती झालेली दिसली तर त्यांना नोटिसा पाठवणे व दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत. आरोग्य विभाग डेंग्यूंचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पण नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे..........

सर्व पातळ्यांवर प्रशासनाचे प्रयत्न सुरू.च्पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डेंग्यूंचे ४०८ रुग्ण, महापालिका हद्दीत ५८० आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १२१ रुग्ण आढळले आहेत. सोसायट्यांसह घरोघरी जाऊन नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. सर्व पातळ्यांवर प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.  

टॅग्स :Puneपुणेdengueडेंग्यू