शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वयोमर्यादा पार केलेल्यांना एमपीएससीची आणखी संधी! लवकरच निर्णय; राज्य मंत्रिमंडळामध्ये झाली चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 12:40 IST

MPSC Exam News: राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेली दोन वर्षे परीक्षा होऊ शकलेली नाही, अशा पदांच्या परीक्षांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढवून दिली जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत बुधवारी चर्चा झाली.

 मुंबई : राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेली दोन वर्षे परीक्षा होऊ शकलेली नाही, अशा पदांच्या परीक्षांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढवून दिली जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत बुधवारी चर्चा झाली.

एमपीएससीमार्फत पदभरतीसाठी परीक्षेची जाहिरात तब्बल दोन वर्षांनंतर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोरोनामुळे परीक्षा वारंवार रद्द करण्यात आलेली होती. उमेदवारांनी त्यासाठी बरीच तयारीदेखील केली. मात्र, परीक्षाच न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली. ही वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व अन्य काही मंत्र्यांनी याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मागणी केली. आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा ३८ वर्षे आहे तर अन्य राखीव उमेदवारांसाठी ती ४३ वर्षे इतकी आहे.  सूत्रांनी सांगितले की एकदा वयोमर्यादा वाढवून संधी हुकलेल्यांना ती पुन्हा देण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाचे मत मागवावे आणि पुढील बैठकीत त्या संबंधीचा प्रस्ताव आणावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासनाला दिले. 

कोरोना काळात एमपीएससीची परीक्षा न झाल्यामुळे वयोमर्यादा पार केलेल्या उमेदवारांना नोकरभरतीच्या नवीन जाहिरातीत अतिरिक्त संधी मिळावी, अशी मागणी मी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष

२५ ऑक्टोबरनंतर राज्यव्यापी दौरा करणारकोल्हापूर : आरक्षणाबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला खुळ्यात काढू नये. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. दिलेला आपला शब्द पाळावा, अन्यथा उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी येथे दिला. याबाबत सरकारला जाग आणण्यासाठी २५ ऑक्टोबरनंतर मराठा समन्वयकांसोबत राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार