शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

कोल्हापुरात ५० हजार गूळ भेलींची जादा आवक

By admin | Updated: October 27, 2016 04:54 IST

येथील बाजारपेठेत यंदा गुळाला चांगला दर असून, आतापर्यंत गतहंगामापेक्षा ५० हजार ६२४ गूळ भेलींची आवक वाढली आहे. भाव चांगला मिळत असल्याने, कर्नाटकातून मोठ्या

कोल्हापूर : येथील बाजारपेठेत यंदा गुळाला चांगला दर असून, आतापर्यंत गतहंगामापेक्षा ५० हजार ६२४ गूळ भेलींची आवक वाढली आहे. भाव चांगला मिळत असल्याने, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गुळाची आवक सुरू असून, महिन्याला सरासरी २० हजार भेली कोल्हापुरात येतात. ३० किलो भेलींना क्विंटलमागे सरासरी ४,५०० रुपये, तर एक किलोच्या भेलींना ५,१५० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. कोल्ड स्टोरेजमधील गूळ संपला आहे.कोल्हापुरात उत्पादन होणाऱ्या गुळापैकी ९५ टक्के माल गुजरातमध्ये जातो. आॅक्टोबरमध्ये हंगाम सुरू होत असल्याने, गुजरातमधील व्यापारी हंगामातच कोल्ड स्टोरेजलाच गुळाची साठवण करतात. यंदा मात्र, कोल्ड स्टोरेजमधील गूळ संपल्याने, नवीन गुळाची मागणी वाढली. परिणामी, दर चांगला आहे. (प्रतिनिधी)शाहू महाराजांनी वसविली बाजारपेठकोल्हापुरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राजर्षी शाहू महाराजांनी १८९५ ला गुळाची बाजारपेठ वसवली. जिल्ह्यात दोन हजारांपेक्षा अधिक गुऱ्हाळघरे कार्यरत होती, पण साखर कारखान्यांची संख्या वाढत गेल्यानंतर, पाचशे ते सहाशे गुऱ्हाळघरे कार्यरत आहेत. साधारणत: दसऱ्यापासून गुऱ्हाळघरांची धुराडी पेटतात. गुजरात मार्केटमध्ये गुळाला चांगला भाव असल्याने, यंदा गूळ उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत आहे. गतवर्षी दर कमी असल्याने, साखर कारखान्यांकडे वळलेला शेतकरी यंदा पुन्हा गुऱ्हाळघरांकडे वळेल.- मोहन सालपे, उपसचिव, कोल्हापूर बाजार समिती