शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मुंबई-गोवा महामार्गावर १००पेक्षा अधिक बळी; ‘डेड ट्रॅक’ची प्रतिमा पुसण्यात अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 15:38 IST

मुंबई - गोवा महामार्गावर गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या अपघातांपेक्षा गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या कमी असली तरी  १००पेक्षा अधिक प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. दीड हजारपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या अपघातांपेक्षा गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या कमी असली तरी  १००पेक्षा अधिक प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. दीड हजारपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत अपघातांची व त्यामध्ये मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या कमी होणार नाही. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम अधिक वेगाने व्हावे, ही कोकणवासीयांची मागणी आहे. गेल्या चार वर्षांच्या काळात मुंबई - गोवा महामार्गावर दरवर्षी एक हजारपेक्षा अधिक अपघात झाले, त्यामध्ये दीडशेपेक्षा अधिक प्रवाशांचे बळी गेले होते. त्या तुलनेत जानेवारी २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत पनवेल ते कसाल या ४५० किलोमीटर  अंतराच्या महामार्गावर ८९१ अपघात घडले. त्यामध्ये १११पेक्षा अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर या अपघातांमध्ये दीड हजार प्रवासी जखमी झाले. त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. मुंबई - गोवा महामार्गावर २०१०पासून २०१६ सालापर्यंत अपघातांची संख्या एक हजार ते दीड हजारच्या दरम्याने कायम राहिली आहे. त्यामध्ये प्रतिवर्षी सरासरी दीडशे ते दोनशे प्रवासी प्राणाला मुकले आहेत. ही स्थिती बदलावी व या महामार्गाची मृत्यूचा सापळा अशी बनलेली प्रतिमा बदलावी, म्हणून दोन दशकांपासून चौपदरीकरणाची मागणी सुरू होती. २०१३मध्ये मंजूर झालेल्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे दीड वर्षापूर्वी निवळी येथे उद्घाटन झाले होते. परंतु  २०१८ मध्ये खºया अर्थाने चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. मात्र, २०१३ व त्याआधीपासूनही चौपदरीकरण होणार आहे म्हणून अस्तित्त्वात असलेल्या महामार्गाच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. त्यामुळे गेल्या पाच ते सात वर्षांमध्ये महामार्गाची स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. ही स्थिती अजूनही  कायम आहे.महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रुंदीकरणाची जागा मोकळी करून घेतली जात आहे. संपूर्ण महामार्गावर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये चौपदरीकरणाच्य कामाने वेग घेतला आहे. तरीही चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास अजून दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र, या काळात जुन्या रस्त्यावरील खड्डे, खराब रस्त्याच्या ठिकाणी पॅचवर्क करणे आवश्यक आहे. चौपदरीकरणानंतर अपघात कमी होतील, अशी अपेक्षा अन्य महामार्गांच्या झालेल्या चौपदरीकरणानंतर व्यक्त झाली होती. परंतु ७० ते ८० प्रतितास वेगामुळे तेथेही अपघातांचे प्रमाण वाढले आहे.  

वाहतूक नियम पाळावेतमहामार्गावरील अपघातांचे प्रमाण पाहता रस्ते खराब झाल्याने अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु मानवी चुकांमुळेही अपघात वाढले आहेत. वाहनांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाहतूक नियमांचा सतत भंग होत असल्याने हे नियम पाळणे अत्यावश्यक झाले आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRatnagiriरत्नागिरी