शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

तळीरामांचा कामोठे वसाहतीकडे ‘मोर्चा’

By admin | Updated: April 6, 2017 02:36 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महामार्गावरील पाचशे मीटरच्या आतमधील पनवेल परिसरातील बीअर बार, वाईन शॉप बंद झाले

अरुणकुमार मेहत्रे,कळंबोली- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महामार्गावरील पाचशे मीटरच्या आतमधील पनवेल परिसरातील बीअर बार, वाईन शॉप बंद झाले आहेत. त्यामुळे नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, पनवेलमधील तळीरामांचा मोर्चा गेल्या एक-दोन दिवसांपासून कामोठे वसाहतीकडे वळताना दिसत आहे. या नोडमध्ये पाचशे मीटरच्या बाहेर असलेल्या तीन-चार बारचे शटर उघडे असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.न्यायालयाच्या निर्देशाचा सर्वाधिक फटका पनवेलला बसला आहे. याचे कारण म्हणजे, या परिसरातून पनवेल-सायन, मुंबई- पुणे, एनएच ४ बी, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग जातो. या व्यतिरिक्त राज्य महामार्गाचाही समावेश आहे. पनवेलसह सिडको वसाहती या महामार्गाच्या बाजूला विकसित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा फटका शहराबाहेरील महामार्गाच्या बाजूच्या तसेच शहरातील दारूच्या दुकानांना बसला आहे. नवीन पनवेलचा विचार केला, तर राष्ट्रीय महामार्ग क्र मांक-४, माथेरान रस्ता, तसेच द्रुतगती महामार्ग लगत असल्याने येथील जवळपास सर्वच बार आणि वाईनशॉपला टाळे लागले आहेत. खांदा वसाहतीमध्येही तीच स्थिती असल्याने बार आणि इतर दारू दुकानांचे शटर डाऊन झाले आहे. कळंबोली नोडही मुंब्रा आणि पनवेल-सायन महामार्गालगत आहे. त्यामुळे पाचशे मीटर अंतरावरील सर्व बार बंद झाले आहेत. फक्त दोन वाईनशॉप सुरू असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. कोपरा येथील अजित पॅलेसमधील दारू विक्र ी बंद झाली असल्याने खारघर परिसर दारूमुक्त झाले आहे; परंतु कामोठे वसाहतीचा परीघ मोठा असल्याने एनएच ४ बी आणि पनवेल-सायन महामार्गापासून पाचशे मीटरपेक्षा दूरवर असणारे पाच बीअरबार मात्र न्यायालयाच्या आदेशातून वाचले आहेत. त्याचबरोबर दोन वाईनशॉपने पाचशे मीटरचे अंतर ओलांडले आहे. त्यामुळे कामोठे नोडमध्ये तुलनेत आता जास्त बार सुरू आहेत. त्यामुळे कामोठेसह नवीन पनवेल, पनवेल, कळंबोली, आणि खारघरमधील तळीराम दारू पिण्याकरिता सायंकाळी वसाहतीत येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या बारमध्ये कमालीची गर्दी उसळत आहे. कळंबोलीतील दारुड्यांचा वावर रोडावलाकळंबोली वसाहतीत मुंब्रा-पनवेल महामार्गाला लागून असलेले वाईनशॉप आता बंद झाले आहेत. या ठिकाणी पूर्वी महामार्गालगत दारूच्या बाटल्या घेऊन दारूडे दारू पीत असत. सायंकाळच्या सुमारास एकच गर्दी होत होती, त्यामुळे येथील रहिवाशांना याचा त्रास होत होता. त्याचबरोबर आजूबाजूच्या दुकानदारांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत होते; परंतु हे वाईनशॉप बंद झाल्याने आता याठिकाणची गर्दी कमी झालेली आहे.अतिक्रमणावर कारवाई कराकामोठे वसाहतीतील सेक्टर ६ ए येथे गोल्डन व्ह्यूअपार्टमेंटमध्ये सरोवर बीअर बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट आहे. या बारमधील दारुड्यांमुळे येथील रहिवासी त्रस्त झाले होते. पाचशे मीटरच्या आतमध्ये असलेले हे बीअरबार आता बंद झाले आहेत. मात्र रेस्टॉरंट चालू असून किचन अतिक्र मण केलेल्या जागेत आहे. आमचा सुंटीवाचून खोकला गेला खरा; परंतु सोसायटीच्या जागेवरील अतिक्र मणावर कारवाई करावी, अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.