शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

विदर्भात रुग्णवाढ; वर्ध्यातही संचारबंदी, शाळा-महाविद्यालये पुन्हा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 06:23 IST

CoronaVirus News : कोराेनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार २० फेब्रुवारी रात्री ८ वाजेपासून ते सोमवार २२ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत वर्धा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता इतर सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. कोराेनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार २० फेब्रुवारी रात्री ८ वाजेपासून ते सोमवार २२ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत वर्धा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.दरम्यान, वर्धा जिल्ह्यात शुक्रवारी १२४७ चाचण्यांपैकी नव्याने १०८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ३० जण बरे होऊन घरी गेले आहेत. सुदैवाने कुणी मृत्यू पावले नाही. ७२४ रुग्ण आयसोलेशन आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ११११३ झाली आहे. गत २४ तासात यवतमाळ जिल्ह्यात १२६ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यात दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला तर २५६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात तब्बल ५९८ अहवाल पॉझिटिव्ह आले असून नवीन वर्षातील हा नवा उच्चांक आहे. 

अकोल्यात रेमडिसीव्हरचा फक्त दहा दिवसांचा साठा सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढल्याने रेमडिसिव्हर इंजेक्शनचा वापरही वाढला आहे. गत आठवडाभरापासून दररोज ३० रेमडिसिव्हर व्हायलचा उपयोग होत आहे. यापूर्वी दिवसाला ३ व्हायलचीच गरज होती. सध्या रुग्णालयात दहा दिवस पुरेल एवढाच साठा आहे. 

जिल्हाधिकारी रस्त्यावरयवतमाळचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह सायंकाळी स्वत: रस्त्यावर उतरले. त्यांनी बाजारपेठेत फेरफटका मारला. विनामास्क दिसलेल्या नऊ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांनी बसस्थानक चाैक व इतरही भागाला भेटी दिल्या.

औरंगाबादेत २६ हजार रुपये दंड वसूलऔरंगाबाद : संसर्ग वाढत असल्याने मंगल कार्यालये व कोचिंग क्लासेसवर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार तपासणी सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी सहा कोचिंग क्लासेस चालकांवर कारवाई करून २६ हजारांचा दंड वसूल केला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस