शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून ११० टक्क्यांपर्यंत विक्रमी मजल मारणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 07:00 IST

भारतीय हवामान शास्त्र विभागाचा अंदाज; सलगता कायम राहिल्यास जास्तीचा पाऊस पडण्याची शक्यता

- सचिन लुंगसे मुंबई : देशासह राज्यात धो धो कोसळणारा पाऊस रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करीत असतानाच २६ सप्टेंबरपर्यंत देशभरात मान्सूनने १०७ टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. महत्त्वाचे म्हणजे ही टक्केवारी सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिक असून, परतीचा पाऊस सुरू होण्यास अद्यापही बहुतांश कालावधी शिल्लक आहे. परिणामी, १०७ टक्क्यांवर पोहोचलेला मान्सून सप्टेंबर महिना संपेपर्यंत ११० टक्क्यांपर्यंत विक्रमी मजल मारेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. या पावसाची नोंद जास्तीचा मान्सून म्हणून केली जाईल.१ जून ते २७ सप्टेंबर या कालावधीत देशभरात ९३१.५ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. प्रत्यक्षात मात्र या काळात सरासरी ८६९.४ मिलीमीटर पावसाची नोंद होते. देशात सरासरीच्या तुलनेत अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला असून, ही नोंद ७ टक्के अधिक आहे.राज्यांचा विचार करता राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, गोवा, कर्नाटक, सिक्कीम, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबारमध्ये अतिरिक्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. हिमाचल, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांत सर्वसाधारण पावसाची नोंद झाली आहे. जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हरयाणा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि मणिपूर या राज्यांत आतापर्यंत सर्वाधिक कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये अतिरिक्तपेक्षा अधिक पावसाची नोंदमहाराष्ट्राचा विचार करता सोलापूर, बीड, लातूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत सर्वांत कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे या जिल्ह्यांत अतिरिक्तपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, अहमदनगर, जळगाव, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत अतिरिक्त पाऊस नोंदविण्यात आला आहे.उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत आतापर्यंत सर्वसाधारण पावसाची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊस