शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मॉन्सून परतीच्या मार्गावर; विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 06:55 IST

१८ ते २० सप्टेंबरदरम्यान ओडिशासह विदर्भ, मराठवाड्यात काही प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे : संपूर्ण देशात सध्या मान्सून क्षीण झाला असून तो परतीच्या मार्गावर आहे. १८ सप्टेंबरला पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन १८ ते २० सप्टेंबरदरम्यान ओडिशासह विदर्भ, मराठवाड्यात काही प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.हवामान विभागाने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा केली नसली तरी त्याचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानातून सुरू झाला आहे़ १८ व १९ सप्टेंबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़ रविवारी सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरसह भूमध्ये पहाटे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.मान्सून अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, तेलंगण, कर्नाटक किनारपट्टी प्रदेश, केरळमधून क्षीण झाला आहे. ८ टक्के कमी पाऊस देशभरात आतापर्यंत सरासरीच्या ८ टक्के कमी पाऊस झाला आहे़ पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश धरणे भरली आहेत़कमी पावसाच्या पट्ट्यात बरसणार १८ सप्टेंबरला पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची स्थिती आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह सोलापूर, सांगली या भागात तीन दिवस पावसाची शक्यता आहे़

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Rainपाऊस