शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
5
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
6
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
7
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
8
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
9
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
10
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
11
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
12
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
13
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
14
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
15
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
16
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
17
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
18
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
19
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

मान्सून यंदा ९८% बरसणार; दामिनी, उमंग, मेघदूत देतात हवामानाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 7:09 AM

वाऱ्याचा वेग आणखी वेगाने समजेल यासाठीची यंत्रणा पश्चिम किनारी उभारण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत.

मुंबई : देशाची मान्सून सरासरी ८८ सेंटिमीटर असून, यंदा देशात जून ते सप्टेंबरदरम्यान ९८ टक्के मान्सून कोसळण्याची शक्यता आहे, तर मान्सून उत्तर पश्चिम भारत आणि मध्य भारतात (महाराष्ट्रात) सरासरी कोसळेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ‘लोकमत’ला दिली. शेतकऱ्याला पुढील पाच दिवसांचे पूर्वानुमान, वादळ असेल तर २४ तास अगोदर माहिती दिली जाते. वाऱ्याचा वेग आणखी वेगाने समजेल यासाठीची यंत्रणा पश्चिम किनारी उभारण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत.

समाज माध्यमांचा कसा वापर करत आहात?भारतीय हवामान खाते हे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा मजबूत पाठिंबा आणि सर्वसामान्य नागरिकांचा आधार या जोरावर हवामान खात्याचे काम सुरू आहे. २००३ पासून दीर्घकालीन पूर्वानुमान दिले जात आहे. २०१७ पासून क्लायमेट फॉर कास्टिंग सिस्टिम वापरली जात आहे. मुख्यालयात समाज माध्यमांचा एक भाग केला आहे. हवामान खात्याच्या प्रत्येक कार्यालयात असा भाग असून, नोडल ऑफिसर यासाठी काम करत आहेत. दामिनीसह मौसम, उमंग, मेघदूतसारखे अ‍ॅप विकसित केले आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी काय करत आहात?मान्सून हा शेतकऱ्याचा वर्षभराचा प्रोग्राम तयार करत असतो. आम्ही कृषी विज्ञान केंद्र उभारत आहोत. याद्वारे तालुकानिहाय हवामानाची माहिती मिळेल. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार होत आहेत. स्थानिक भाषेत माहिती दिली जाते. अनेक शेतकरी हवामान विभागाशी जोडले गेले आहेत. पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टिम तयार केली आहे. नागरिकांना याची माहिती वेब पोर्टलवर देता येते.पूर परिस्थिती, मोठ्या पावसाचे भाकीत कसे वर्तविणार?फ्लड वॉर्निंग सिस्टिमद्वारे जिल्हा, तालुकास्तरावरील पुराचे भाकीत करता येते. याचा फायदा आपत्कालीन व्यवस्थापन विभागासह जनतेला होतो. मुंबईत खूप पाऊस पडणार असेल तर त्याची माहिती आम्ही वॉर्ड स्तरावर २४ ते ४८ तासांत देऊ शकतो. एवढी क्षमता आम्ही निर्माण केली आहे. मोठ्या पावसाने पडणारा प्रभावही आम्ही सांगत आहोत.डॉप्लर, रडारचा फायदा होत आहे का ?किनारपट्टीच्या भागात ढगफुटी होण्याची शक्यता फारच कमी असते. ढगफुटी ही सर्वसाधारण दहा मिनिटे किंवा अर्धा तास होते. तीव्र पाऊस पडला आणि त्याने पंधरा मिनिटांत प्रलय आला तर त्यास ढगफुटी म्हणता येईल. डॉप्लर, रडार चार तास अगोदर माहिती देतात की संबंधित ठिकाणी मोठा पाऊस पडणार आहे. निरीक्षण प्रणालीत बदल झाले असून, पूर्वी आम्ही २०० किलोमीटरपर्यंतचे अंदाज देत होतो. आता १२ किलोमीटरखाली आलो आहोत. यासाठी सुपर कॉम्प्युटरचा आधार घेत आहोत.(मुलाखत : सचिन लुंगसे)

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊस