शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
3
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
4
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
5
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
6
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
7
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
8
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
9
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
11
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
12
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
13
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
14
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
15
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
16
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
17
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
18
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
19
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
20
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनने अर्धा महाराष्ट्र व्यापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 05:20 IST

नैर्ऋत्य मोसमी पावसाने शनिवारी जोरदार वाटचाल करीत अर्धा महाराष्ट्र व्यापला असून कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली़ मराठवाड्यातही धुवांधार पाऊस झाला.

मुंबई/पुणे  - नैर्ऋत्य मोसमी पावसाने शनिवारी जोरदार वाटचाल करीत अर्धा महाराष्ट्र व्यापला असून कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली़ मराठवाड्यातही धुवांधार पाऊस झाला. येत्या चार दिवसांत कोकण, गोवा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे़मान्सूनने राज्यात अहमदनगर, परभणी, यवतमाळ, ब्रम्हपुरी तसेच राजनंदगाव, भावानीपटणी, पुरी येथपर्यंत मजल मारली आहे़ येत्या ४८ तासांत महाराष्ट्र, छत्तीसगडचा आणखी काही भाग, ओडिशा, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम, बंगालच्या उपसागरातील उर्वरित भाग तसेच ईशान्यकडील राज्यांमध्ये मॉन्सून पोहचण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे़मालवण तालुक्यात विक्रमी पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मालवण शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने रहिवाशांना रात्र जागून काढावी लागली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होता.विदर्भातही जोरदार!हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंदझाली. माळहिवरा, बासंबा, कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, वसमत, कुरुंदा, हयातनगर परिसरात धो-धो पाऊस पडला.परभणी जिल्ह्यातही सर्वदूर जोरदारपाऊस झाला. पूर्णा आणि गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला.लातूर जिल्ह्यातही पावसाचा जोर होता. औसा, निलंगा, देवणी, रेणापूर या तालुक्यात जोरदार पाऊस झाला. शिरूर अनंतपाळ ते नागेवाडी रस्त्यावर घरणी नदीवर असलेल्या छोट्या पुलावरुन वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात पडल्याने प्रकाश सोमनाथ जळकोटे यांचा मृत्यू झाला. रेणापूरातही एकजण वाहून गेलातर औसा तालुक्यात भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला.विदर्भात मंगरुळपीर, कारंजा, वाशिम, मालेगाव, नारखेडा, आर्वी, रिसोद, पुसद, यवतमाळ, अरणी, नंदगाव काजी, परतवाडा, अकोला, बाभूळगाव, वर्धा येथे पाऊस झाला़घाटमाथ्यावरी लोणावळा, भिरा, वळवण, ताम्हिणी, धारावी, डुंगरवाडी, कोयना (पोफळी), भिवपुरी, खंद, शिरोटा, खोपोली आदी ठिकाणी दमदार सरी बरसल्या.पावसाने बुडाली खेळणी: सोलापूर शहरात पडणाºया पावसाने सात रस्ता परिसरातील चिल्ड्रन पार्कमध्ये पाणी साठले आहे.मालवण शहर आणि परिसरात ठिकठिकाणी झाडे पडून वीज पुरवठा खंडित झाला होता.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Rainपाऊस