शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हवामान खात्याचा अंदाज चुकला; मान्सून आठवडाभर लांबला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 20:09 IST

यंदा मान्सून आठवडाभर लांबल्याची चिन्हे आहेत. एरवी १५ ते १७ मे दरम्यान अंदमानात धडकणारा मान्सून अद्यापही तिथे धडकलेला नाही. तो पुढील ७२ तासात तेथे धडकणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

मुंबई - यंदा मान्सून आठवडाभर लांबल्याची चिन्हे आहेत. एरवी १५ ते १७ मे दरम्यान अंदमानात धडकणारा मान्सून अद्यापही तिथे धडकलेला नाही. तो पुढील ७२ तासात तेथे धडकणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.अंदमान ते कोकण हा मान्सूनचा प्रवास साधारण १५ दिवसांचा असतो. अंदमानातील मान्सून केरळात येण्यासाठी ६ ते ८ दिवसांचा कालावधी लागतो. यंदा मान्सून २९ मेदरम्यान केरळात धडकेल, असा अंदाज याआधी हवामान खात्याने जाहिर केला असला तरी तो अंदमानातच आलेला नाही. पुढील ७२ तासात तो अंदमानच्या समुद्रात दाखल झाला तरी तेथून फक्त तीन दिवसांत केरळात येण्याची शक्यता धूसर आहे. यामुळे यंदाचा हा मोसमी पाऊस आता २ ते ३ जूनदरम्यानच केरळात येईल. तेथून कोकणात येण्यासाठी आणखी ४ ते ६ दिवस व मुंबईसाठी पुढे आणखी २ दिवस लागण्याचा अंदाज आहे. कोकण व मुंबई व्यापल्यानंतरच मान्सूनचा राज्याच्या अन्य भागातील प्रवास सुरू असतो.एकाचवेळी अंदमान व केरळकेरळ, लक्षद्विपचा समुद्र सध्या चिघळला आहे. वादळी वातावरण तिथे तयार झाले आहे. यामुळे अंदमान व केरळात मान्सून एकाचवेळी धडकणार का? अशीही चर्चा आहे.अंदामानामध्ये आलेल्या चक्री वादळामुळे, मान्सून अंदमानात उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. या आधी सुद्धा अंदमानात एक चक्रीवादळ येऊन गेले आहे आणि आत्ताही तेथे एक चक्रीवादळ आहे.त्यामुळे मान्सूनची गती काहीशी कमी झाली आहे. मात्र तरीही पुढील 72 तासात मान्सून अंदमानात दाखल होईल अशी अपेक्षा आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या चक्रीवादळाचा प्रभाव कायम राहिल्यास केरळात मान्सून लांबण्याची चिन्हे आहेत. - डॉ ए के श्रीवास्तव , ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ , पुणे हवामान विभाग

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Indiaभारतnewsबातम्या