शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

फास्टफूडमुळे वानरांनाही कॅन्सरचा विळखा; सिल्लोड तालुक्यात उघडकीस आला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 06:50 IST

योग्य उपचार केल्यानंतर वानराच्या जखमेतून चार दिवसांत दुर्गंध व स्त्राव वाहने बंद झाले.

श्यामकुमार पुरे

सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर): जीवनशैली बदलामुळे  अनेक वानरांना कर्करोग होत असल्याचे समोर आले असून, तालुक्यातील तोंडापूर येथील कर्करोग झालेल्या एका  वानरावर शुक्रवारी उपचार करून त्याला जामनेर येथे पाठविण्यात आल्याची माहिती जैवविविधता संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी दिली. 

पर्यावरण व वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्य करणारे सिल्लोड येथील त्वचारोग तज्ज्ञ  डॉ. संतोष पाटील हे गेल्या दहा  वर्षांपासून पक्षी, कीटक, साप, माकड आदी जखमी व आजारी वन्यजीवांवर मोफत उपचार करतात. याच अनुषंगाने एक वानर जखमी असल्याची माहिती त्यांना तोंडापूर परिसरातील ग्रामस्थांकडून मिळाली. जखमी वानरावर उपचार करत असताना वानरास जखम नसून गुद्वाराचा अँनो रेक्टल कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्या जखमेतून पूसदृश स्त्राव वाहत होता व त्यातून दुर्गंधीपण येत होती. त्यावर योग्य उपचार केल्यानंतर वानराच्या जखमेतून चार दिवसांत दुर्गंध व स्त्राव वाहने बंद झाले. त्यानंतर निगराणी व अधिक उपचारासाठी त्यास  जामनेर येथे हलवण्यात आले आहे.

जीवनशैली बदलाचे बळी आता वानरहीबऱ्याच पर्यटन ठिकाणी पर्यटक माकडांना चिप्स, कुरकुरे  व इतर पॅक फूड देतात. त्यात असलेले प्रेझर व्हेटिव्ह हे माकडांना हानिकारक ठरते. पोळी सुद्धा त्यास हानिकारक आहे. कारण त्यात ग्लूटेन असते व ते पचवणे माकडाला जड जाते. पर्यटकांनी काळजी घ्यावी.  शिजवलेला व प्रक्रिया केलेला मानवी आहार माकड व तत्सम जिवांना देऊ नये, त्यांचा नैसर्गिक आहार, झाड पालाच योग्य आहे. - डॉ. संतोष पाटील, जैवविविधता संवर्धक,  अभिनव प्रतिष्ठान

किती प्रमाण आढळले?डॉ. पाटील यांना आतापर्यंत दोन माकडांत हा आजार आढळला आहे.  ०.३ इतके कर्करोगाचे प्रमाण वानरात आढळत आहे. हे प्रमाण वाढत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. काही विशिष्ट विषाणू व जीवन शैली बदल ही कारणे या मागची कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.